यंदाच्या IPL लिलाव प्रक्रियेला प्रिती झिंटा मुकणार, ‘हे’ आहे कारण

प्रिती झिंटा यंदाच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याने लिलाव प्रक्रियेत तिचे प्रतिनिधीत्व कोण करणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर तिला यासंबंधी प्रश्न विचारला आहे.

preity zinta will not participate ipl 2022 auction punjab kings
यंदाच्या IPL लिलाव प्रक्रियेला प्रिती झिंटा मुकणार, 'हे' आहे कारण

IPL 2022 Auction : बंगळुरूमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियम लीगच्या लिलावात पंजाब किंग्जची मालकीण प्रिती झिंटा लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नाहीये. प्रितीने सोशल मीडियावर याबाबत माहिती देत लिलाव प्रक्रियेत सहभागी न होण्याचे कारण सांगितले आहे. प्रिती झिंटा काही दिवसांपूर्वीच सरोगसीच्या माध्यमातून आई झाली. तिच्या तान्ह्या बाळाला सोडून ती भारतात येऊ शकत नसल्याने ती आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नाहीये.

प्रितीने आयपीएल लिलावातील एक जुना फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘यावर्षी मला आयपीएल लिलावात हिस्सा घेता येणार नाही. कारण माझ्या छोट्या बाळांना सोडून मी भारतात येऊ शकत नाही. मागच्या काही दिवसात मी आणि माझी संपूर्ण टीम लिलाव आणि क्रिकेटसंदर्भातील गोष्टींवर चर्चा करण्यात व्यक्त आहोत’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

प्रितीने पुढे म्हटले आहे की, ‘मी माझ्या चाहत्यांना विचारू इच्छिते की, त्यांच्या आमच्या नव्या संघासाठी आणि खेळाडूंसाठी काही सूचना किंवा तक्रारी आहेत आहे का? त्याचप्रमाणे तुम्हाला यंदा आमची टीम लाल जर्सीमध्ये पाहायला आवडेल का?’

प्रिती झिंटा यंदाच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याने लिलाव प्रक्रियेत तिचे प्रतिनिधीत्व कोण करणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर तिला यासंबंधी प्रश्न विचारला आहे. तर काही युझर्सनी तिला डेविड वॉर्नरला तुझ्या टीममध्ये आणण्याचा सल्ला दिलाय. डेविड आला तर टीमचा फायदा होईल,असे म्हटले आहे.

प्रिती झिंटा नोव्हेंबर २०२१मध्ये सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली. आई झाल्यानंतर प्रिती आणि तिचा नवरा जीन गुडइनफ मुलांची काळजी घेण्यात व्यस्त आहे. लग्नाच्या पाच वर्षांनी आई झालेली प्रिती सध्या तिच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे.


हेही वाचा – Video : लग्नाच्या वाढदिवशी Sanjay Duttने केला पत्नी मान्यताचा फूट मसाज,…