Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा शाहरुख खानमुळे प्रीती झिंटाचा आनंद द्विगुणीत; Video व्हायरल

शाहरुख खानमुळे प्रीती झिंटाचा आनंद द्विगुणीत; Video व्हायरल

Subscribe

नवी दिल्ली : पंजाब किंग्ज फलंदाज शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने राजस्थान विरोधात तुफानी पारी खेळली. या खेळीने पंजाबची मालकिन प्रीती झिंटाचा (Preity Zinta) आनंद द्विगुणीत झाला होता. याचा व्हिडिओ सध्या सोसल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामातील 66 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघ आमनेसामने होते. यावेळी राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबच्या 4 विकेट अवघ्या 50 धावांवर पडल्या होत्या. यानंतर सॅम करन आणि जितेश शर्मा यांनी पाचव्या विकेटसाठी 64 धावांची भागिदारी केली. जितेश शर्मा 28 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 44 धावा करून बाद झाल्यानंतर शाहरुख मैदानावर आला. त्यानंतर सॅम करन आणि शाहरुख खान यांनी 37 चेंडूत 73 धावांची भागिदारी केली. यावेळी सॅम करनने नाबाद 31 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या, तर शाहरुख खानने नाबाद 23 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या आणि संघाला निर्धारीत 20 षटकात 187 धावा केल्या.

- Advertisement -

शाहरूख खानच्या खेळीने प्रीती झिंटा आणि पंजाब किंग्जच्या चाहत्यांचं हृदय जिंकलं. झाले असे की, शाहरुख आणि सॅम करनने राजस्थानचा गोलंदाज युजवेंद्र चहलची चांगलीच धुलाई केली. 19 वे षटक टाकण्यासाठी चहल आला. यावेळी शाहरुख खान आणि सॅम करन या दोघांनी मिळून चौकार षटकार खेचत 28 धावा मारल्या. यावेळी शाहरुख आणि सॅम कनरनची तुफानी फटकेबाजी बघून पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाचा आनंद द्विगुणीत झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

सामना संपेपर्यंत प्रीती झिंटाचा कार्यक्रम टिकू शकला नाही. राजस्थान संघाने 4 विकेट्सने हा सामना जिंकत पंजाब किंग्जला प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे पंजाब किंग्ज पुन्हा एकदा प्ले-ऑफच्या शर्यतीत पोहचू शकली नाही. सामना संपल्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने वक्तव्य केले की, आमची खराब सुरुवात झाल्यानंतर जितेश शर्मा, शाहरुख खानआणि सॅम करनने चांगली फटकेबाजी करत आम्हाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहचवले. पंरतु, आम्ही भेदक गोलंदाजी करू शकलो नाही. त्यामुळे मला वाटते की, या मैदानावर 200 धावा आम्ही करू शकलो असतो अधिक चांगले झाले असते.

- Advertisment -