Padma Awards 2020: मूर्ती लहान पण कीर्ती महान; पद्म श्री पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपती मंचावरून उतरले

के वाय व्यंकटेशला सन्मानित करण्यासाठी खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रोटोकॉलला बाजूला करून मंचावरून खाली उतरून व्यंकटेशला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले

केंद्र सरकारतर्फे एकुण सात खेळाडूंना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. ज्या ७ खेळांडूचा पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये कर्नाटक राज्यातील ४४ वर्षीय के वाय व्यंकटेशचा पण समावेश आहे. या व्यंकटेश यांची उंची फक्त ४ फूट २ इंच एवढीच आहे. के वाय व्यंकटेशला सन्मानित करण्यासाठी खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रोटोकॉलला बाजूला करून मंचावरून खाली उतरून व्यंकटेशला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. व्यंकटेशन यांनी पॅरा-अॅथलेटिक्समध्ये केलेल्या विक्रमी कामगिरीमुळे पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यंकटेशने त्यांच्या करिअरची सुरूवात १९९४ मध्ये केली होती. त्यांनी जर्मनीत झालेल्या पहिल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. त्यासोबतच २००९ मध्ये देखील पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व केले होते.

२००९ च्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण १७ पदक जिंकले होते. पॅरा-अॅथलेटिक्समधील चांगली खेळी आणि या खेळासाठी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे ४४ वर्षीय के वाय व्यंकटेश यांना पद्म श्री देऊन सन्मानित करण्यात आले.

मंचावरून उतरून राष्ट्रपतींनी केले सन्मानित

के वाय व्यंकटेशला पुरस्कार देताना राष्ट्रपतींनी केलेल्या कृत्यामुळे त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंचावरून उतरून पॅरा- अॅथलेटिक्स के वाय व्यंकटेश यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. उंचीने फक्त ४ फूट २ इंच असलेल्या व्यंकटेश यांना पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपती पायऱ्यांवरून खाली उतरले. व्यंकटेश यांनी २००५ मध्ये चौथ्या वर्ल्ड ड्वार्फ गेम्समध्ये सहा पदके जिंकून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश केला होता.

व्यंकटेशच्या नावावर कित्येक विक्रमांची नोंद

के वाय व्यंकटेश यांनी तेव्हा देशाचे नाव चमकवले जेव्हा २००५ मध्ये त्याने नाव वर्ल्ड ड्वार्फ गेम्समध्ये सर्वाधिक पदक जिंकून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली. त्यांनी या खेळात पहिला भारतीय अॅथलेटिक्स आहे आणि त्याने यात पदक देखील जिंकले आहे. पॅरालिम्पिक सारखेच वर्ल्ड ड्वार्फ गेम्स दर ४ वर्षानंतर आयोजित केले जाते. के वाय व्यंकटेश यांनी १९९४ मध्ये त्याच्या करिअरची सुरूवात केली होती तेव्हा त्याने जर्मनीमधील बर्लीनमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीच्या अॅथलेटिक्स विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताचे नेतृत्व केले. आता तो सेवानिवृत्त झाला आहे आणि कर्नाटक पॅरा-बॅडमिंटनच्या सचिव पदाचा कारभार सांभाळत आहे.


हे ही वाचा : T20 world cup 2021: ENG VS NZ पहिल्या उपांत्य फेरीत आज इंग्लंड आणि न्यूझीलंड आमनेसामने