घरक्रीडाधोनीसारख्या यष्टिरक्षकाची जागा घेण्याचा दबाव -राहुल

धोनीसारख्या यष्टिरक्षकाची जागा घेण्याचा दबाव -राहुल

Subscribe

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेट खेळलेला नाही. त्याच्या जागी भारताने युवा रिषभ पंतला संधी दिली, पण त्याला याचा फारसा उपयोग करता आला नाही. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पंतला वगळण्यात आले आणि लोकेश राहुलने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली. राहुलने मागील काही काळात यष्टिरक्षण आणि फलंदाजी या दोन्हीत सर्वांना प्रभावित केले आहे. मात्र, त्यालाही धोनीसारख्या महान खेळाडूची जागा घेण्याचा दबाव जाणवतो.

मला भारतासाठी यष्टिरक्षकाची भूमिका पार पडताना दबाव जाणवतो. लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात. तुम्ही जर एक जरी चूक केली, चेंडू सोडला, तर लोकांना लगेच वाटू लागते की तुम्ही धोनीची जागा घेऊ शकणार नाही. धोनीसारख्या महान यष्टिरक्षकाची जागा घेण्याचा माझ्यावर खूप दबाव होता, कारण यष्टींमागे धोनी नसून दुसरा कोणता तरी खेळाडू आहे हे लोकांना स्वीकारणे अवघड जाते, असे राहुलने नमूद केले.

- Advertisement -

कधीही यष्टिरक्षण करण्यास तयार!
राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटआधी आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये यष्टिरक्षण करत होता. जे लोक सातत्याने क्रिकेट पाहतात त्यांना ठाऊक आहे की बर्‍याच काळापासून यष्टिरक्षण करत आहे. मी आयपीएल, तसेच कर्नाटकसाठी प्रत्येक वेळी खेळताना यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडतो. त्यामुळे संघाला गरज असेल तेव्हा यष्टिरक्षण करण्यास मी तयार असतो, असे राहुल म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -