घरक्रीडाIPL 2022, LSG vs DC : दिल्लीची दमदार सुरूवात, पृथ्वी शॉचं तुफानी...

IPL 2022, LSG vs DC : दिल्लीची दमदार सुरूवात, पृथ्वी शॉचं तुफानी अर्धशतक

Subscribe

आयपीएल २०२२च्या पंधराव्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना होत आहे. दिल्लीची कमान ऋषभ पंत संभाळत आहे. तर लखौनच्या संघाची धुरा केएल राहुलकडे आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन के.एल.राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दिल्लीचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करत आहे. लखनौ विरुद्ध दिल्लीचा फलंदाज पृथ्वी शॉने ३० चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. यामध्ये त्याने ८ चौकार आणि एक षट्कार लगावला आहे. दिल्लीने ७ ओव्हर्समध्ये ५७ नाबाद धावा केल्या आहेत.

- Advertisement -

दिल्ली आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आजचा सामना नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये होत आहे. मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा गुजरात जायंट्सने पराभव केला होता. लखनौने सलग दोन सामने जिंकले आहेत. पॉइंटस टेलबमध्ये लखनौ पाचव्या आणि दिल्ली कॅपिटल्स सातव्या स्थानावर आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. सायफर्ट, मनदीप आणि खलील यांच्याजागी डेविड वॉर्नर, सर्फराज आणि नॉर्खिया यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्याची स्थिती पाहिली असता दिल्लीच्या तीन विकेट्स गेल्या आहेत. रोव्हमॅन पॉवेलला रवी बिश्नोईने तीन धावांवर बोल्ड केल्यानंतर १४ ओव्हर्स पूर्ण झाल्या असून ९४ धावा पूर्ण झाल्या आहेत.

- Advertisement -

असे आहेत दोन्ही उभय संघ

अशी आहे दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ टीम –

ऋषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, सरफराज खान, रोव्हमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया आणि मुस्तफिजुर रहमान

अशी आहे लखनौची प्लेईंग ११ टीम –

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डि कॉक, इविन लुइस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, अँड्यू टाय, रवी बिश्नोई आणि आवेश खान


हेही वाचा : IND vs PAK Series: भारत-पाकिस्तान मालिकेवर लवकरच होणार निर्णय, PCB आणि BCCI मध्ये होणार महत्वाची बैठक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -