घरIPL 2020IPL 2020 : पृथ्वी शॉची नकोशी कामगिरी; तब्बल पाचव्यांदा पहिल्याच षटकात बाद 

IPL 2020 : पृथ्वी शॉची नकोशी कामगिरी; तब्बल पाचव्यांदा पहिल्याच षटकात बाद 

Subscribe

मुंबईविरुद्ध क्वालिफायर-१ च्या सामन्यात पृथ्वी खातेही न उघडता बाद झाला. 

पृथ्वी शॉ हा भारतातील सर्वात प्रतिभावान युवा फलंदाजांपैकी एक मानला जातो. मात्र, कामगिरीत सातत्याचा अभाव, खराब फटके, तसेच फिटनेसची कमतरता यामुळे त्याच्यावर नेहमीच टीका होत असते. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना पृथ्वी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने यंदाच्या स्पर्धेत अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याला १३ सामन्यांत १७.५३ च्या सरासरीने केवळ २२८ धावा करता आल्या असून यात केवळ दोन अर्धशतकांचा समावेश आहे. आज होत असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध क्वालिफायर-१ च्या सामन्यात पृथ्वीने आपली निराशाजनक कामगिरी सुरु ठेवली.

क्वालिफायर-१ च्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २०० अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना दिल्लीला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती, पण पृथ्वीला ती करून देता आली नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पृथ्वीला डावाच्या दुसऱ्याच षटकात यष्टीरक्षक डी कॉककरवी झेलबाद केले. पृथ्वीला खातेही उघडता आले नाही. भोपळा न फोडता माघारी परतण्याची ही पृथ्वीची मागील ६ सामन्यांत तिसरी वेळ होती. तसेच यंदाच्या आयपीएल मोसमात पहिल्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही पृथ्वीची तब्बल पाचवी वेळ होती. त्यामुळे पृथ्वीवर सोशल मीडियावरून बरीच टीका होत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -