घरक्रीडाMumbai vs Assam Ranji: रणजी ट्रॉफीत पृथ्वी शॉची बॅट तळपली,दिग्गज खेळाडूंना देखील...

Mumbai vs Assam Ranji: रणजी ट्रॉफीत पृथ्वी शॉची बॅट तळपली,दिग्गज खेळाडूंना देखील टाकलं मागे

Subscribe

भारतात रणजी ट्रॉफीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. यावेळी मुंबई विरुद्ध आसाम यांच्यातील सामना गुवाहाटीला सुरू आहे. परंतु या सामन्यात मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉची बॅट तळपली आहे. पृथ्वी शॉने दमदार खेळी करत इतिहास रचला आहे. तर दिग्गज खेळाडूंनाही त्याने मागे टाकलं आहे.

युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, तरी देखील त्याने देशांतर्गत सुरू असलेल्या स्पर्धेत किंवा सामन्यात छाप सोडली आहे. शॉने त्रिशतक झळकावत महान फलंदाज आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. पृथ्वीने आसामविरुद्धच्या सामन्यात ३७९ धावांची खेळी केली. तसेच रणजी इतिहासातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू ठरला आहे. त्याने ३८३ चेंडूत ३७९ धावा ठोकल्या आहेत. तर टेस्ट मॅचमध्ये त्याने वनडे स्टाइलमध्ये फलंदाजी केली आहे. ३७९ धावांचा टप्पा पार करतेवेळी पृथ्वीने ४९ चौकार आणि ४ षट्कार मारले आहेत.

- Advertisement -

पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेटमध्येही अनोखा विक्रम केला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक, विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक आणि रणजी ट्रॉफीमध्ये तिहेरी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही.

भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याच्या यादीत शॉ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अव्वल क्रमांकावर भाऊसाहेब निंबाळकर आहेत. त्यांनी १९४८-४९ हंगामात काठीयावार संघाविरुद्ध महाराष्ट्राकडून खेळताना नाबाद ४४३ धावा केल्या होत्या.

- Advertisement -

भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावा करणारे क्रिकेटपटू –

४४३* धावा – भाऊसाहेब निंबाळकर (१९४८-४९)

३७९ धावा – पृथ्वी शॉ (२०२२-२३)

३७७ धावा – संजय मांजरेकर (१९९०-९१)

३६६ धावा – एमव्ही श्रीधर (१९९३-९४)


हेही वाचा : IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात भारताचा दमदार विजय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -