घरक्रीडाIND vs SA Test Series : रोहितच्या जागी संधी मिळालेल्या प्रियांकने सांगितला...

IND vs SA Test Series : रोहितच्या जागी संधी मिळालेल्या प्रियांकने सांगितला कोच द्रविड यांचा सल्ला

Subscribe

रोहित शर्माच्या जागेवर गुजरातचा मधल्या फळीतील फलंदाज प्रियांक पांचालला भारतीय संघात संधी मिळाली आहे

दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येलाच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या कसोटी मालिकेतून बाहेर गेला आहे. सोबतच त्याच्या एकदिवसीय मालिकेतील पुनरागमनावर देखील शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान रोहित शर्माच्या जागेवर गुजरातचा मधल्या फळीतील फलंदाज प्रियांक पांचालला भारतीय संघात संधी मिळाली आहे. प्रियांक सध्या भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरच होता. प्रियांक पाचांलने दक्षिण आफ्रिकेच्या अ’ संघाविरूध्द भारतीय संघाची कमान सांभाळली होती. प्रियांकने सांगितले की, जेव्हा त्याला पहिल्यांदा भारताच्या अ संघाची कमान मिळाली होती. तेव्हा तो खूप उत्साहित होता मात्र प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांनी त्याला सामान्य वागण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचा त्याला खूप फायदा झाला.

सोबतच प्रियांकने म्हंटले की, “मी मागील काही कालावधीपासून या संधीची वाट बघत होतो. मी गुजरात आणि भारत अ’ च्या संघासाठी चांगले प्रदर्शन करत होतो आणि पण या मालिकेत संधी मिळणे माझ्यासाठी अनपेक्षित होते.”

- Advertisement -

प्रियांक काही दिवसांपूर्वीच भारताच्या अ’ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून माघारी परतला आहे आणि त्याला एकवेळा पुन्हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. याबाबतीत प्रियांकने म्हंटले की, “मी तीन दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतून माघारी आलो आहे आणि आणखी एकवेळा भारतीय संघासोबत मुंबईत बायो-बबलमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. मला दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच खेळलेल्या मालिकेचा फायदा होईल.” प्रियांकने सोबतच ट्विटरवर दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

- Advertisement -

प्रियांक पाचांलने दक्षिण आफ्रिकेच्या अ’ संघाविरोधात पहिल्या प्रथम श्रेणीतील सामन्यात ९६ धावांची खेळी केली होती त्यामुळे भारतीय संघाला सामना अनिर्णित करण्यास खूप मदत मिळाली होती. प्रियांकने एकूण १०० प्रथम श्रेणीतील सामने खेळले होते. १६३ डावात प्रियांकच्या नावावर ७०११ धावांची नोंद आहे. तर प्रियांकने त्याच्या प्रथम श्रेणीतील कारकिर्दीत २४ शतके झळकावली आहेत.


हे ही वाचा : http://Virat Kohli Vs Rohit Sharma : ‘ब्रेक घ्यायला हरकत नाही, पण वेळ…; माजी कर्णधार अझहरुद्दीन यांचे विराट-रोहितबद्दल ट्विट


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -