घरक्रीडाPro Kabaddi League 2021 : उद्यापासून सुरू होतोय कबड्डीचा रनसंग्राम; जाणून घ्या,...

Pro Kabaddi League 2021 : उद्यापासून सुरू होतोय कबड्डीचा रनसंग्राम; जाणून घ्या, काय आहेत नवे नियम

Subscribe

कबड्डीची सर्वात मोठी लीग प्रो-कबड्डी लीगला उद्यापासून म्हणजेच बुधवारपासून सुरूवात होत आहे

कबड्डीची सर्वात मोठी लीग प्रो-कबड्डी लीगला उद्यापासून म्हणजेच बुधवारपासून सुरूवात होत आहे. यावेळीच्या ८ व्या हंगामात १२ संघ आमनेसामने असतील. यासाठी खेळाडू मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. कोरोनाच्या कारणास्तव तब्बल दोन वर्षांनी ही लीग पुन्हा खेळवली जात आहे. यावेळी स्पर्धेतील १२ संघांमध्ये क्रमवारीनुसार एकूण ६६ सामने खेळवले जाणार आहेत.

यु मुंबाने जिंकला होता मागील हंगाम

प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील पहिला सामना बंगळुरू बुल्स विरूध्द यु मुंबा असणार आहे. यु मुंबाने मागील हंगामाचा किताब पटकावला होता. कोरोनाच्या कारणास्तव हा हंगाम केवळ बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान सामन्यादरम्यान प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच प्रेक्षकांविना सामने खेळवले जातील. यासोबतच एका दिवसात तीन सामन्यांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

एका दिवसांत तीन सामनेही होणार

आठव्या हंगामातील पहिले चार दिवस आणि प्रत्येक शनिवारी तीन सामने होणार आहेत. सातव्या हंगामातील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पवन कुमार सेहरावतवर पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष असेल. तर, या वर्षी लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या प्रदीप नरवालवर देखील सर्वांचे लक्ष असेल. कोरोनाच्या कारणास्तव काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पर्यायी खेळाडूंची संख्या देखील पाच केली आहे.

एक सामना ४० मिनिटांचा असेल

सामन्याच्या दिवशी सर्व संघाना कमीत कमी १० किंवा त्याहून जास्त १२ खेळाडूंना संघात ठेवावे लागेल. यामध्ये एक विदेशी खेळाडू असणे गरजेचे आहे. एक सामना ४० मिनिटांचा असेल, यामध्ये २०-२० मिनिटांचे दोन हाफ असतील. दोन्ही हाफमधील वेळेमध्ये पाच मिनिटांचे अंतर असेल. पहिल्या हाफ नंतर दोन्हीही संघ मैदानातील बाजू बदलतील. म्हणजेच दोन्ही संघ एकमेकांची जागा घेतील.

- Advertisement -

बोनस गुण दिला जाणार

विरोधी संघातील प्रत्येक खेळाडू बाहेर पडल्यास किंवा बाहेर पाडल्यास, सर्व संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. विरोधी संघाला ऑल आउट करणाऱ्या संघाला दोन अतिरिक्त गुण मिळतील. जर रेड टाकत असलेल्या खेळाडूला तीन किंवा कमी खेळाडूंनी पकडले तर बचाव करणाऱ्या संघाला बोनस पॉइंट मिळेल. या बोनस पॉइंटमध्ये दोन गुण असतील.

खेळाडूंना आरामासाठी वेळ मिळणार

सामन्यात दोन्ही संघांना विश्रांतीसाठी ९० सेकंद देण्यात येणार आहेत. संघाचा कर्णधार, प्रशिक्षक किंवा कोणताही खेळाडू पंचाच्या परवानगीने हा निर्णय घेऊ शकतो. त्यानंतर जिथे खेळ थांबला होता त्याच वेळी पुन्हा सामना सुरू होईल. त्यावेळी कोणताही संघ मैदान सोडू शकत नाही. तर नियमांचे उल्लंघन केल्यास विरोधी संघाला बोनस गुण दिले जातील.

संघ एक वेळा प्रशिक्षकांशी संवाद साधू शकतो

सामन्यातील पंच किंवा टीव्ही अंपायर खेळाडूस दुखापत झाल्यास किंवा कोणताही त्रास झाल्यास अधिकृत वेळ देऊ शकतात. संघाच्या टाइमआउटपेक्षा हे वेगळे असेल. सामन्याच्या अर्ध्या वेळेत संघाला प्रशिक्षकाशी चर्चा करण्याची एकच संधी दिली जाईल. यासाठी २० सेकंद दिले जातील.

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -