Pro Kabaddi : यु मुंबाच्या सिद्धार्थ देसाईचा नवा विक्रम

यु मुंबाचा रेडर सिद्धार्थ देसाईने नवा विक्रम केला आहे.

सिद्धार्थ देसाई (सौ-sportskeeda)

यु मुंबाचा रेडर सिद्धार्थ देसाईने नवा विक्रम केला आहे. त्याने प्रो कबड्डीमध्ये सर्वात जलद ५० पॉईंट मिळवण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम यु मुंबाचा माजी कर्णधार अनुप कुमारच्या नावे होता. अनुप कुमारला ५० पॉईंटचे लक्ष्य गाठण्यासाठी ५ सामने खेळावे लागले होते. तर सिद्धार्थने अवघ्या ४ सामन्यांतच ५० पॉईंटचा टप्पा गाठला आहे. त्याने यावर्षी आपल्या पदार्पणाच्या मोसमात ४ सामन्यांत एकूण ५१ पॉईंट मिळवले आहेत.


यु मुंबाने ५ मोसमानंतर अनुप कुमारला संघात परत न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेक चाहत्यांना निराशा झाली होती. पण सिद्धार्थच्या अप्रतिम कामगिरीमुळे चाहत्यांची निराशा जरा कमी झाली आहे. अनुपला पहिल्या दोन मोसमांनंतर चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे यु मुंबाने त्याला संघात पुन्हा घेतले नव्हते.