घरक्रीडानवी मुंबई महापालिका अजिंक्य

नवी मुंबई महापालिका अजिंक्य

Subscribe

व्यावसायिक निमंत्रित विभागीय खो-खो

नवी मुंबई महानगरपालिकाने महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि मुंबई खो-खो संघटनेच्या सहकार्‍याने विद्यार्थी क्रीडा केंद्राने आयोजित केलेल्या व्यावसायिक निमंत्रित विभागीय खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले. तसेच ज्युनियर गटात (४ फुट ११ इंच) विहंग क्रीडा मंडळाचा संघ विजयी ठरला.

व्यावसायिकांच्या अंतिम सामन्यात नवी मुंबई महानगरपालिकेने श्री साई इलेकट्रिक्सला १६-१५ (६-५) असे जादा डावात पराभूत केले. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात पूर्ण डावात दोन्ही संघांमध्ये १०-१० अशी बरोबरी होती. त्यामुळे जादा डाव खेळवण्यात आला, ज्यात नवी मुंबई महानगरपालिकेने ६-५ अशी अवघ्या एका गुणाने बाजी मारली.

- Advertisement -

त्यांच्याकडून महेश शिंदे (२:४०, १:५०; १:१० मिनिटे संरक्षण), गजानन शेंगाळ (१:३०, १:१०; १:५० मिनिटे संरक्षण आणि पाच बळी), संकेत कदम (१:२०, १:४०; नाबाद १:३० मिनिटे संरक्षण आणि दोन बळी) या खेळाडूंनी चांगला खेळ केला. श्री साईच्या विश्वजित कांबळेने (१:५०, १:५०; १:५० मिनिटे संरक्षण आणि एक बळी) झुंजार खेळ केला, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

ज्युनियर मुलांच्या अंतिम सामन्यात विहंग क्रीडा मंडळाने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा ५-४ असा पराभव केला. त्यांच्या या विजयात मयुरेश मोरे (४:५०, ३:५० मिनिटे संरक्षण), गणेश यादव (नाबाद २:१०, २:०० मिनिटे संरक्षण आणि दोन बळी) हे खेळाडू चमकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -