सामना सुरू होण्याआधीच पंजाब किंग्ज बॅकफुटवर जाण्याची शक्यता, गुजरात टायटन्सचं प्लेऑफवर लक्ष

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आज लढत होणार आहे. नवीन मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत गुजरातने विजय मिळवल्यास त्यांचे स्थान प्लेऑफमध्ये निश्चित होईल. गुजरातने ९ पैकी ८ सामन्यात विजय मिळवून १६ गुण मिळवले आहेत.

गुजरातकडे राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर, राशिद खान आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांसारखे खेळाडू विजय मिळवून देणारे आहेत. यापैकी एखादा खेळाडू अपयशी ठरला तर दुसरा खेळाडू त्याची जागा घेऊ शकतो. पंजाब किंग्जला कामगिरीत सातत्य दाखवता आले नाहीये. ९ पैकी सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. या संघात आघाडीचे फलंदाज मयांक अग्रवाल, जॉनी बेयरस्टो, शिखर धवन आणि लियम लिविंगस्टोन यांच्या कामगिरीत सातत्य नाहीये, त्यामुळे संघाच्या विजयावर परिणाम होत आहे. गोलंदाजीत अर्शदीप सिंहने चांगली कामगिरी केली आहे.

गुजरात संघात ऋद्धिमान साहाने मॅथ्यू वेडची जागा घेतली आहे. त्याने शुभमन गिल सोबत संघाला चांगली सुरूवात करुन दिली आहे. गिलने काही सामन्यात धावा केल्या असल्या तरी तो पुन्हा फॉर्ममध्ये येण्यास उत्सुक असेल. गुजरातच्या फलंदाजीचा मुख्य आधार हार्दिक जरी असला तरी गोलंदाजीत मोहम्मद शमी तुफान कामगिरी करत आहे. दोन्ही संघांमध्ये या हंगामात झालेल्या पहिल्या लढतीत अखेरच्या दोन चेंडूवर राहुल तेवतियाने षट्कार मारून थरारक विजय मिळून दिला होता.

असा आहे उभय संघ –

गुजरात टायटन्स – शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप सांवान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.

पंजाब किंग्ज – मयांक अग्रवाल, शिखर धवन, भानुका राजपक्षे, जॉनी बेयरस्टो, लियम लिविंगस्टोन, जितेश शर्मा, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंह.


हेही वाचा : Weight Lifting : पुण्याच्या हर्षदा गरुडची उंच झेप, जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक