घरक्रीडाIPL 2021 Auction: ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांवर मोठी बोली; पंजाबने केले खरेदी 

IPL 2021 Auction: ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांवर मोठी बोली; पंजाबने केले खरेदी 

Subscribe

खेळाडू लिलाव गुरुवारी पार पडत आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी मोसमाआधीचा खेळाडू लिलाव गुरुवारी पार पडत आहे. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिस आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असून त्याला राजस्थान रॉयल्सने तब्बल १६.२५ कोटी रुपयांत खरेदी केले. तसेच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवरही या लिलावात मोठी बोली लागल्याचे पाहायला मिळाले. अनुभवी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला १४.२५कोटी रुपयांतरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने खरेदी केले. तसेच ऑस्ट्रेलियाचे युवा वेगवान गोलंदाज जाय रिचर्डसन आणि रायली मेरेडीच यांचीही चांदी झाली आहे. या दोघांनाही पंजाब किंग्स संघाने खरेदी केले आहे.

आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळणार

पंजाबने रिचर्डसनला १४ कोटी, तर मेरेडीचला ८ कोटी रुपयांत खरेदी केले. रिचर्डसनने नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने १७ सामन्यांत २९ विकेट घेतल्या होत्या आणि सार्वधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर राहिला होता. त्यामुळे पंजाबने त्याच्यावर मोठी बोली लावली. दुसरीकडे मेरेडीचने यंदाच्या बिग बॅश लीगमध्ये १३ सामन्यांत १६ विकेट घेतल्या. रिचर्डसन आणि मेरेडीच या दोघांनाही आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा अनुभव नाही. मात्र, रिचर्डसन याआधी ऑस्ट्रेलियाकडून खेळला आहे.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -