घरक्रीडाIPL 2022: पंजाब-बंगळुरूच्या सामन्यात षटकारांचा पाऊस

IPL 2022: पंजाब-बंगळुरूच्या सामन्यात षटकारांचा पाऊस

Subscribe

बंगळुरूचं हे आव्हानं पाहता पंजाब २०५ धावांचं लक्ष्य पुर्ण करेल का? अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली होती. मात्र, पंजाबनं या चर्चांना 'किंग्ज' पद्धतीनं पुर्ण विराम देत सामना आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे या सामन्याच षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. या सामन्यात एकूण २७ षटकार मारण्यात आले. बंगळुरूकडून १३ आणि पंजाबकडून १४ षटकार मारले गेले.

पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ५ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकत पंजाबनं फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळं प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ गडी गमावून २०५ धावा केल्या. बंगळुरूचं हे आव्हानं पाहता पंजाब २०५ धावांचं लक्ष्य पुर्ण करेल का? अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली होती. मात्र, पंजाबनं या चर्चांना ‘किंग्ज’ पद्धतीनं पुर्ण विराम देत सामना आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे या सामन्याच षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. या सामन्यात एकूण २७ षटकार मारण्यात आले. बंगळुरूकडून १३ आणि पंजाबकडून १४ षटकार मारले गेले.

बंगळुरूचे दिलेल्या २०५ धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबनं १४.५ षटकात १५६ धावांवर ५ विकेट गमावल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ओडियन स्मिथ आणि शाहरुख खाननं संघाची धुरा सांभाळली. तसंच, या अटीतटीच्या सामान्यात बंगळुरूच्या अनुज रावतनं ओडियनची कॅच सोडली. मात्र, ओडियनची कॅच सोडणं बंगळुरू संघाला चांगलंच महागात पडलं.

- Advertisement -

ओडियन ८ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने २५ धावा करून नाबाद राहिला. तसंच, शाहरुखने २० चेंडूत २४ धावा करत नाबाद राहिला. दरम्यान पंजाब किंग्जनं दुसऱ्यांना सर्वाधिक लक्षाचा पाठलाग केला आहे. याआधी २०१४ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांनी २२११ धावांचं लक्ष्य गाठलं होतं.

प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चांगली तडगी कामगिरी केली. फाफ डू प्लेसिसची कर्णधार खेळी आणि शेवटी दिनेश कार्तिकच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर बेंगळुरूनं २० षटकांत २ गडी गमावून २०५ धावा केल्या. विराट कोहलीनंही चांगली फलंदाजी करत २९ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ४१ धावा केल्या. त्याचवेळी, दिनेश कार्तिकनं ३ चौकार आणि ३ षटकार मारत १४ चेंडूत ३२ धावांची नाबाद खेळी केली.

- Advertisement -

२०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या संघानं चांगली सुरुवात केली. मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांच्यात ७१ धावांची सलामी भागीदारी झाली. पंजाबला मयंकच्या रूपाने पहिला धक्का बसला. २४ चेंडूत ३२ धावा करून तो बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत २ चौकार आणि २ षटकार मारले.

यानंतर धवन आणि आयपीएल पदार्पण करणाऱ्या भानुका राजपक्षे यांनी दुसऱ्या विकेटसाठी २५ चेंडूत ४७ धावांची भागीदारी केली. धवन २९ चेंडूत ४३ धावा करत बाद झाला. त्यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.


हेही वाचा – IPL 2022: मुंबई इंडियन्सला दुहेरी झटका, आध दिल्लीकडून पराभव, मग रोहित शर्माला लाखोंचा दंड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -