घरक्रीडापीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक, रेड्डी-पोनप्पा इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतून...

पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक, रेड्डी-पोनप्पा इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतून बाहेर

Subscribe

इंडोनेशियाच्या खेळाडूने दुसरा गेम दोन गुणांसह जिंकला. मात्र तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने प्रतिस्पर्ध्याला एकही संधी दिली नाही आणि सामना जिंकला.

भारताची दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता पीव्ही सिंधू आणि जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता लक्ष्य सेनना जिंकून इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बँकॉकमधील थॉमस चषक स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपदाच्या वेळी भारतीय संघाचा भाग असलेल्या अल्मोराच्या 20 वर्षीय लक्ष्यने जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या रासमुस गेमकेचा 54 मिनिटांत 21-18, 21-15 अशा फरकाने पराभव केला. तर सिंधूला महिला एकेरीत थोडा संघर्ष करावा लागला. एका तासाच्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजांगचा 23-21,20-22,21-11 असा पराभव केला.

पिव्ही सिंधू समोर उपांत्यपूर्व फेरीत कडवे आव्हान असेल. चौथ्या मानांकित भारतीयाचा सामना पाचव्या मानांकित थायलंडच्या रत्चानोक इंतानोन आणि स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोर यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. तर बी सुमीथ रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांचा प्रवास मिश्र दुहेरीत 18-21, 13-21 असा पराभूत झाल्याने झेंग सी वेई आणि चीनच्या हुआंग या कियांग दुसऱ्या मानांकित चीनच्या जोडीकडून दुसऱ्या फेरीच्या लढतीत पराभव झाला.

- Advertisement -

बिगरमानांकित तुनजुंगविरुद्ध, सिंधूने चांगली सुरुवात केली आणि आक्रमक खेळ करत 10-5 अशी आघाडी घेतली. सुरुवातीला त्यांनी दिर्घकालीन खेळीचा चांगला वापर केला. सिंधूकडून सहा वेळा पराभूत झालेल्या इंडोनेशियाच्या खेळाडूने शानदार पुनरागमन करत गुणसंख्या 15-15 अशी केली. परंतु भारतीय खेळाडूनने आपली खेळी दाखवून 20 गुणांनी विजय प्राप्त केला आहे.

दुसऱ्या गेममध्ये परिस्थिती पूर्णपणे विरुद्ध होती, तुनजुंगने 10-5 अशी आघाडी घेतली परंतु सिंधूने पुन्हा 15-15 आणि नंतर 20-20 अशी आघाडी घेतली. इंडोनेशियाच्या खेळाडूने दुसरा गेम दोन गुणांसह जिंकला. मात्र तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने प्रतिस्पर्ध्याला एकही संधी दिली नाही आणि सामना जिंकला.

- Advertisement -

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत प्रथमच गेमकेविरुद्ध खेळताना, जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर असलेल्या लक्ष्यने अधिक संयम दाखवला आणि आपल्या चुका रोखून विजयाची नोंद केली. सेन पहिल्या गेममध्ये 0-3 ने पिछाडीवर होता पण पुनरागमन करत 9-6 अशी आघाडी घेतली. गेमके मात्र ब्रेकपर्यंत 11-10 अशा कमी फरकाने आघाडीवर होता. भारतीय खेळाडूने मात्र ब्रेकनंतर सलग सहा गुण घेत 16-12 अशी आघाडी घेतली आणि पहिला गेम सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने मात्र 13-12 असे सलग चार गुण जिंकले आणि त्यानंतर गेम आणि सामना जिंकला. सातव्या मानांकित सेनची पुढील लढत चायनीज तैपेईच्या तिसऱ्या मानांकित चौ तिएन चेनशी होईल.


हेही वाचा : T20 मध्ये पहिल्यांदाच 7 फलंदाजांनी मारले 3 हून अधिक षटकार, अय्यरचाही खास विक्रम

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -