घरक्रीडाथायलंड ओपनमध्ये सिंधू उपांत्य फेरीत दाखल

थायलंड ओपनमध्ये सिंधू उपांत्य फेरीत दाखल

Subscribe

सिंधूचा सामना उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या ग्रिगोरिया मारिष्कासोबत असणार आहे. सिंधू आणि ग्रिगोरिया यांच्यात विजयी होणारी खेळाडू थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे

थायलंडमधील बँकॉक येथे सुरू असलेल्या टोयाटो थायलंड ओपन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने उपांत्य पूर्वफेरी जिंकत उपांत्य फेरीत झेप घेतली आहे. सिंधूने मलेशियाच्या सोनिया चिहलाला मात देत विजय मिळवला आहे. सिंधूच्या या विजयामुळे तिच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिंधूने भारतीय बॅडमिंटनला एका वेगळ्या उंचीवर नेले असून यापूर्वी बरेच पुरस्कार तिने भारतासाठी जिंकून आणले आहेत. रिओ ऑलिम्पिक मध्ये तिने रौप्यपदक जिंकले होते. आता सुरू असलेल्या थायलंड ओपनमध्येही ती विजय मिळवण्यच्या हेतूने खेळताना दिसत आहे.


याआधी सिंधूने हाँगकाँगच्या यिप पुई यिनवर २१-१६, २१-१४ च्या फराकाने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. स्पर्धेत सिंधूचे आतापर्यंतचे प्रदर्शन अप्रतिम असून तिने आता उपांत्य पूर्वफेरी जिंकत थेट उपांत्य फेरी गाठली आहे.  जवळपास ३६ मिनिटे चाललेल्या सामन्यात सिंधू आणि सोनिया यांच्यात चांगली चुरस दिसून येत होती. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात सिंधूने पहिला गुण मिळवला आणि आपले खाते खोलले. पुढे सोनियाने सामन्यात १२-८ अशी आघाडी घेतली खरी मात्र पुन्हा सिंधूने सामन्यात कमबॅक करत २१-१७, २१-१४ च्या फरकाने विजय मिळवला.

- Advertisement -

यानंतर सिंधूचा सामना उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या ग्रिगोरिया मारिष्कासोबत असणार आहे. सिंधू आणि ग्रिगोरिया यांच्यात विजयी होणारी खेळाडू थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. थायलंड ओपनसारख्या मोठ्या स्पर्धेत सिंधूच्या इतक्या चांगल्या प्रदर्शनामुळे आता ती सेमी फायनल आणि फायनलमध्ये कसे प्रदर्शन करते याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -