घरक्रीडासिंधू दुसर्‍याच फेरीत गारद

सिंधू दुसर्‍याच फेरीत गारद

Subscribe

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी.व्ही.सिंधूला ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसर्‍याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये साई प्रणित, समीर वर्मा, पुरुष दुहेरीत स्वस्तिकसाईराज राणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी हे सुद्धा दुसर्‍या फेरीत पराभूत झाले. पारुपल्ली कश्यपने चीनचा महान खेळाडू लिन डॅनला चांगली झुंज दिली. मात्र, त्याला हा सामना जिंकण्यात अपयश आल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणार्‍या सिंधूचा थायलंडच्या २९व्या क्रमांकावर असणार्‍या निचॉन जिंदपोलने १९-२१, १८-२१ असा पराभव केला. या दोन खेळाडूंमध्ये आतापर्यंत ७ सामने झाले असून, सिंधूचा हा निचॉनविरुद्धचा दुसरा पराभव होता. सिंधूने या सामन्याची चांगली सुरुवात करत पहिल्या गेमच्या मध्यंतराला ११-९ अशी आघाडी मिळवली होती. यानंतर निचॉनने आक्रमक खेळ करत १६-१२ अशी मोठी आघाडी मिळवली, पण सिंधूने चांगला खेळ करत १९-१९ अशी बरोबरी केली. मात्र, निचॉनने पुढील दोन्ही गुण मिळवत हा गेम २१-१९ असा जिंकला. दुसर्‍या गेममध्ये सिंधूने चांगले पुनरागमन करत १४-११ अशी आघाडी मिळवली होती, पण निचॉनने आपला खेळ उंचावत पुढील ७ गुण मिळवत १८-१४ अशी आघाडी घेतली. तिने आपला चांगला खेळ सुरू ठेवत हा गेम २१-१८ असा जिंकला.

- Advertisement -

पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत साई प्रणितवर अँथनी गिंटिंगने २३-२५, ९-२१ अशी, तर समीर वर्मावर चिनी तैपेईच्या वांग झू वेईने १६-२१, २१-१७, १३-२१ अशी मात केली. पारुपल्ली कश्यपला रंगतदार सामन्यात लिन डॅनने १७-२१, २२-२०, १४-२१ असे पराभूत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -