घरक्रीडाDenmark Open : सिंधू पहिल्याच फेरीत आऊट

Denmark Open : सिंधू पहिल्याच फेरीत आऊट

Subscribe

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूला डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे.

भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूला डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. पहिल्या फेरीत तिचा अमेरिकेच्या बीवेन झॅन्ग हिने १७-२१, २१-१६, १८-२१ असा पराभव केला. सिंधूने झॅन्गच्या विरोधात सलग तिसरा सामना गमावला आहे. त्यामुळे तिच्यावर स्पर्धेबाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे.

असा झाला सामना 

या सामन्यात पहिला सेट सिंधूने १७-२१ असा गमावला. पण दुसऱ्या सेटमध्ये तिने चांगले पुनरागमन केले. त्यामुळे तिने हा सेट २१-१६ असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये झॅन्गने योग्यवेळी आपला खेळ उंचावत हा सेट २१-१८ जिंकत सामनाही जिंकला. त्यामुळे तिने सिंधूला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -