CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत पी.व्ही. सिंधूने जिंकले 200 वे सुवर्णपदक

बर्मिंगहॅम येथे झालेल्या च्या अखेरच्या दिवशी बॅडमिंटन पटू पीव्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकले. पी. व्ही. सिंधूने जिंकलेले हे सुवर्णपदक राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासातील भारताचे 200 वे पदक ठरले आहे. विशेष म्हणजे 200 पदक जिंकणार भारत चौथा देश ठरला आहे.

बर्मिंगहॅम येथे झालेल्या च्या अखेरच्या दिवशी बॅडमिंटन पटू पीव्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकले. पी. व्ही. सिंधूने जिंकलेले हे सुवर्णपदक राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासातील भारताचे 200 वे पदक ठरले आहे. विशेष म्हणजे 200 पदक जिंकणार भारत चौथा देश ठरला आहे. (PV Sindhu wins India’s 200th gold medal in Commonwealth Games)

राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 1003 सुवर्णपदके ऑस्ट्रेलियाने जिंकली आहेत. तसेच या स्पर्धेच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. तसेच, 773 पदके जिंकत इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे, तर 510 पदके जिंकत कॅनडा तिसऱ्या स्थानावर आहे.

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण 61 पदके जिंकली आहेत. यामध्ये 22 सवर्णपदक, 16 रौप्यपदक आणि 23 कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारत पदतालिकेत चौथ्या स्थानावर राहिला.

दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने कुस्तीत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी 12 पदके जिंकली आहेत. यामध्ये 6 सुवर्णपदक, १ रौप्यपदक आणि ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये 10 पदके आली. तसेच, बॉक्सिंगमध्ये भारताने 3 सुवर्णांसह 7 पदके जिंकली आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचा इतिहास

भारताने 1958 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकले होते. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी हे सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर उत्कृष्ट अशी कामगिरी करत भारताने सुवर्णपदकं जिंकली. परंतु, 2010 साली दिल्लीत झालेली राष्ट्रकुल स्पर्धा भारतासाठी सर्वात यशस्वी ठरली होती. या स्पर्धेत भारताने 38 सुवर्णपदकं जिंकली होती.

राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवलेले खेळाडू मंगळवारी विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर या खेळाडूंच्या चाहत्यांनी आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचे स्वागत केले. सोमवारी समारोप समारंभात टेबल टेनिसपटू शरथ कमल आणि महिला बॉक्सर निखत झरीन हे भारतीय संघाचे ध्वजवाहक होते.


हेही वाचा – आयसीसीचे माजी पंच रुडी कर्टझेन यांचे निधन, दक्षिण आफ्रिकेतील रिव्हरडेल परिसरात झाला अपघात