Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा क्वारंटाईनमुळे विराट-रोहितमधील दुरावा मिटला!  

क्वारंटाईनमुळे विराट-रोहितमधील दुरावा मिटला!  

बाहेरील व्यक्तींना बायो-बबलमध्ये परवानगी नसल्याने खेळाडूंना एकमेकांसोबत अधिक वेळ घालवावा लागत आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा संपूर्ण जगावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले असून खेळही याला अपवाद ठरलेले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, क्रिकेटपटूंना विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. क्रिकेटपटूंना बायो-बबलमध्ये (जैव-सुरक्षित वातावरण) राहावे लागत आहे. तसेच त्यांना बाहेरील व्यक्तींना भेटण्याची परवानगीही नाही. अनेक महिने बायो-बबलमध्ये राहिल्याचा खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे विराट कोहलीने स्पष्ट केले आहे. बाहेरील व्यक्तींना बायो-बबलमध्ये परवानगी नसल्याने खेळाडूंना एकमेकांसोबत अधिक वेळ घालवावा लागत आहे. याचा आता भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माला फायदा झाल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राचे म्हणणे आहे. विराट आणि रोहितमध्ये आता नव्याने मैत्री झाली आहे.

मतभेद संपवण्याचा प्रयत्न

२०१९ मध्ये इंग्लंड येथे एकदिवसीय वर्ल्डकप झाला. त्यावेळी विराट आणि रोहित यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचे म्हटले जात होते. मात्र, एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान या दोघांनी चर्चा करून आपल्यातील मतभेद संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच या दोघांची पुन्हा नव्याने मैत्री व्हावी यासाठी भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पुढाकार घेतल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

संबंध अधिकच चांगले झाले

- Advertisement -

‘भारताने दोन मोठ्या मालिका जिंकल्याच, पण त्याचवेळी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमसाठी आनंदाची आणि महत्वाची गोष्ट घडली. मागील काही आठवड्यांत खेळाडूंना एकमेकांसोबत अधिक वेळ घालवावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्यातील संबंध अधिकच चांगले झाले आहेत. विराट आणि रोहित यांच्यातील संबंधही खूप सुधारले आहेत,’ असे या इंग्रजी वृत्तपत्राला सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -