Homeक्रीडाRahul Dravid : ऑटो रिक्षाची धडक अन् द्रविडचा पारा चढला, व्हिडीओ होतोय...

Rahul Dravid : ऑटो रिक्षाची धडक अन् द्रविडचा पारा चढला, व्हिडीओ होतोय व्हायरल

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड हा शांत स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याला एखाद्या गोष्टीने रागही येतो, यावर त्याचे चाहते किंवा इतर कोणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र राहुल द्रविडचा बंगळुरूमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड हा शांत स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याला एखाद्या गोष्टीने रागही येतो, यावर त्याचे चाहते किंवा इतर कोणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र राहुल द्रविडचा बंगळुरूमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राहुल द्रविड हा बंगळुरूच्या रस्त्यावर एका ऑटो रिक्षाच्या चालकासोबत वाद घालताना दिसत आहे. (Quiet Rahul Dravid got into an argument with an auto rickshaw driver in Bengaluru)

मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो रिक्षाने राहुल द्रविडच्या गाडीला बंगळुरूच्या वर्दळीच्या कनिंघम रोडवर धडक दिली. राहुल द्रविड हा इंडियन एक्सप्रेस जंक्शनहून हाय ग्राउंड्सकडे जात होता. याचवेळी ट्रफिकमध्ये अडकलेल्या राहुल द्रविडच्या गाडीला ऑटो रिक्षाने मागून धडक दिली. ट्रफिकमध्ये असताना ऑटो चालकाने मागून धडक दिल्यामुळे राहुल द्रविड संतापला. तो कन्नड भाषेत ड्रायव्हरशी वाद घालताना दिसला. यानंतर राहुल द्रविड तिथून निघून गेला. या घटनेबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र ऑटो चालकासोबत द्रविडने घातलेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Rashid Khan : टी-20 मध्ये राशीद खान ठरला सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू; ड्वेन ब्राव्होचा मोडला विक्रम

टाइम्स ऑफ इंडिया बेंगळुरूच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील पोस्टनुसार, कनिंघम रोडवर किरकोळ अपघातानंतर वाद झाला. या अपघातात दोन्ही वाहनांमधील कोणालाही दुखापत झाली नाही. एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, हा अपघात  मंगळवारी (4 फेब्रुवारी) संध्याकाळी 6.30 च्या सुमारास झाला. या अपघात प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र राहुल द्रविडने घटनास्थळ सोडण्यापूर्वी ऑटो चालकाचा फोन नंबर आणि ऑटोचा नोंदणी क्रमांक घेतला आहे.

हेही वाचा – Team India : भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफला पोलिसांनी चाहता म्हणून अडवलं अन्…; पाहा काय घडलं?