घरक्रीडाSA vs PAK : डी कॉकचा पिच्छा सोडा, त्याने कोणतीही चीटिंग केली नाही!

SA vs PAK : डी कॉकचा पिच्छा सोडा, त्याने कोणतीही चीटिंग केली नाही!

Subscribe

तबरेझ शम्सीने डी कॉकला पाठिंबा दर्शवला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकला सध्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी पार पडला. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानने १९३ धावांची खेळी केली. मात्र, तो पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकला नाही. ३४२ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी ३१ धावांची आवश्यकता होती. या षटकातील पहिल्या चेंडूवर झमानने दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुसरी धाव घेताना डी कॉकने झमानचे लक्ष विचलित केले. त्याने चेंडू नॉन-स्ट्राईकच्या दिशेने फेकला जात आहे असे झमानला भासवले. त्यामुळे तो धावचीत झाला आणि पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. सामना संपल्यावर डी कॉकला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. मात्र, डी कॉकने कोणतीही चीटिंग केलेली नाही असे म्हणत दक्षिण आफ्रिकन संघातील त्याचा सहकारी तबरेझ शम्सीने त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

डी कॉकची चूक नाही

‘मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. डी कॉक फलंदाजाला काही बोलला नाही किंवा त्याने फलंदाजाकडे बोट केले नाही. त्याने केवळ फिल्डरला बोट दाखवून नॉन-स्ट्राईकवरील स्टम्पच्या मागे जाण्यास सांगितले. आता फलंदाजाने धाव पूर्ण करायची सोडून मागे वळून पाहिले यात डी कॉकची चूक नाही. डी कॉकने कोणतीही चूक केली नाही. त्यामुळे त्याचा पिच्छा सोडा,’ असे शम्सी त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. तसेच फलंदाज धाव पूर्ण करायची सोडून अर्ध्यातच थांबला हे हास्यास्पद नाही का? असा प्रश्नही त्याने उपस्थित केला.

- Advertisement -

क्रिकेटपटूंनी व्यक्त केली नाराजी

डी कॉकने झमानला धावचीत केल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावरून टीका झाली. तसेच पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वकार युनिस आणि शोएब अख्तर, वेल्सचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅलन विल्किन्स, त्याचप्रमाणे वेस्ट इंडिजचा अष्टपैलू शर्फेन रुदरफोर्ड यांसारख्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -