IPL 2022 : आयपीएल २०१९ च्या वादानंतर अश्विन आणि बटलर एकाच संघात, विरेंद्र सेहवागचे हजरजबाबी ट्विट

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाला सुरूवात झाली असून हे हंगाम क्रिकेट प्रेमींसाठी खूप खास असणार आहे. या हंगामात दोन नवीन संघांचा समावेश असणार आहे. तसेच यामध्ये खेळाडूंची बदली सुद्धा करण्यात आली आहे. २०१९ च्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला आर अश्विन यंदा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. राजस्थान रॉयल्सने ५ कोटींची बोली लावली आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे अश्विन राजस्थानच्या जोन्स बटलरसोबत खेळताना दिसणार आहे.

२०१९ मध्ये दोघांमध्ये झाला होता वाद

२०१९ च्या आयपीएलमध्ये अश्विन आणि बटलर याच्यात मनकडचा वाद रंगला होता. हा वाद क्रिकेटच्या इतिहासात चर्चेचा विषय ठरला होता. त्यावेळी आर अश्विन किंग्ज इलेव्हन पंजाबमधून खेळत होता आणि जॉस बटलर राजस्थान रॉयल्समध्ये होता. तेव्हा अश्विन बॉलिंग करत असताना बटलरने धावण्याचा प्रयत्न केला. परंतु चपळ खेळाडू असणाऱ्या अश्विनने चांगली संधी साधत त्याला मनकड केलं.

बटलरने व्यक्त केली नाराजी

बटलरच्या रनआऊट नंतर बरेच वाद झाले. अश्विनच्या खेळाडूवृत्तीच्या बाबतीतही बरीच टीका करण्यात आली. रनआऊटने मी खरोखर निराश झालो होतो. ज्या पद्धतीने मला रनआउट करण्यात आलं. ते मला आवडलेलं नाही, अशी नाराजी बटलरने व्यक्त केली.

विरेंद्र सेहवागने दिली अशी प्रतिक्रिया

अश्विनला राजस्थानमध्ये घेतल्यामुळे बटलरसोबत मनकड कट रचायला आवडेल, असं विरेंद्र सेहवान म्हणाला.


हेही वाचा : IPL लिलावातील जायंट किलर ठरला इशांत किशन ! मुंबई इंडियन्सकडूनच खेळणार