घरक्रीडाजगातला दुसरा सर्वात छोटा ग्रँड मास्टर आर. प्रज्ञानंद!

जगातला दुसरा सर्वात छोटा ग्रँड मास्टर आर. प्रज्ञानंद!

Subscribe

आर प्रज्ञानंदवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, पाच वेळा विश्वविजेता ठरलेला भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदनेही प्रज्ञानंदला कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत

भारताचा आर. प्रज्ञानंद जगातला दुसरा तर भारताचा सर्वात कमी वयाचा पहिला ग्रँड मास्टर म्हणून घोषित झाला आहे. इटलीत चाललेल्या ग्रेडीन ओपनच्या अंतिम फेरीत पोहचल्यानंतर त्याला हा खिताब देण्यात आला आहे. बुद्धिबळात आठव्या फेरीत जीएम मोरोनीला नमवत अंतिम फेरीमध्ये तो पोहोचला आहे. युक्रेनचा सर्जी कर्जकीन २००२ मध्ये बुद्धीबळातील आतापर्यंतचा सर्वात कमी वयाचा ग्रँड मास्टर म्हणून घोषित करण्यात आला होता. २००२ मध्ये त्याचे वय १२ वर्षे आणि ७ महिने इतके होते. तर प्रज्ञानंदचे वय १२ वर्षे १० महिने असल्यामुळे त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. २०१६ मध्ये प्रज्ञानंदचे वय १० वर्षे १० महिने असताना त्याने सर्वात कमी वयाचा आंतरराष्ट्रीय मास्टरचा खिताब पटकावला होता.

जगजेत्ता विश्वनाथन आनंदने दिल्या शुभेच्छा

आर प्रज्ञानंदवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, पाच वेळा विश्वविजेता ठरलेला भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदनेही प्रज्ञानंदला कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. “ग्रँड मास्टरसच्या क्लबमध्ये तुझे स्वागत आणि अभिनंदन प्रज्ञानंद !! आपण लवकरच चेन्नईमध्ये भेटू” या शब्दात विश्वनाथन आनंदने प्रज्ञानंदला शुभच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

आर प्रज्ञानंदने या आधीच आपला पहिला ग्रँड मास्टरचा खिताब पटकावला आहे. वर्ल्ड ज्युनियर २०१७ या स्पर्धेत आपला पहिला ग्रँड मास्टरचा खिताब प्रज्ञानंदने पटकावला आहे. तर ग्रीसमध्ये झालेल्या टुर्नामेंटमध्ये त्याने आपला दुसरा ग्रँड मास्टरचा खिताब पटकावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -