घरक्रीडाFrench Open 2022 : 'फ्रेंच ओपन'चा गतविजेता जोकोविचचा पराभव; नदालची उपांत्य फेरीत...

French Open 2022 : ‘फ्रेंच ओपन’चा गतविजेता जोकोविचचा पराभव; नदालची उपांत्य फेरीत प्रवेश

Subscribe

फ्रान्समधील रोलँड गॅरोस स्टेडियममध्ये 'फ्रेंच ओपन 2022' ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील कालचा सामना नदालने आणि नोव्हाक जोकोविचचा यांच्यात झाला. या सामन्यात नदालने जोकोविचचा पराभव केला. त्यानंतर आता नदालची लढत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होणार आहे.

‘फ्रेंच ओपन 2022’ ही टेनिस स्पर्धा (French Open 2022) अंतिम टप्प्यात पोहोचली असून, दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने (Rafael Nadal) उपांत्या फेरीत (Semi Finals) प्रवेश केला आहे. नोव्हाक जोकोविचचा (Novak Djokovic) 6-2, 4-6, 6-2, 7-6 असा पराभव करत उपात्य फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे सर्बियाचा नोव्हाक जोकोविच हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर तसेच फ्रेंच ओपनचा गतविजेता आहे. त्यामुळे इतक्या अनुभवी खेळाडूचा पराभव केल्याने नदालचे सर्वच स्तरावरून कौतूक केले जात आहे.

फ्रान्समधील रोलँड गॅरोस स्टेडियममध्ये ‘फ्रेंच ओपन 2022’ ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील कालचा सामना नदालने आणि नोव्हाक जोकोविचचा यांच्यात झाला. या सामन्यात नदालने जोकोविचचा पराभव केला. त्यानंतर आता नदालची लढत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होणार आहे. आणि हा सामना जिंकल्यास नदाल रविवार ५ जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत (Finals) प्रवेश करू शकणार आहे.

- Advertisement -

या विजयासह नदाल आता रोलँड गॅरोस येथे 14 वे विजेतेपद आणि विक्रमी 22 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्याच्या मार्गावर आहे. शिवाय, फ्रेंच ओपनमध्ये सर्वाधिक एकेरी विजेतेपदांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल

दरम्यान, सर्बियाचा नोव्हाक जोकोविच हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तसेच, फ्रेंच ओपनचा गतविजेताही आहे. फ्रेंच ओपनमध्ये दोन्ही दिग्गजांमध्ये विजेतेपदासाठी संघर्ष होण्याची ही 8 वी वेळ होती. मात्र नदालने जबरदस्त खेळ करत जोकोविचला स्पर्धेतून बाद केले.

- Advertisement -

फ्रेंच ओपन ही व्यावसायिक टेनिसमधील चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. एका कॅलेंडर वर्षातील ही दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. फ्रेंच ओपन नेहमीच क्ले कोर्टवर खेळली जाते. राफेल नदाल याने 13 वेळा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत.


हेही वाचा – Ind Vs SA : दक्षिण आफ्रिकेचा संघ ‘या’ दिवशी दिल्लीला पोहोचणार; 9 जूनला खेळणार पहिला टी-२० सामना

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -