Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा नदाल विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत दाखल

नदाल विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत दाखल

या विजयाने नदालने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना सर्बियाच्या नोवाक जोकोविचशी होणार आहे

Related Story

- Advertisement -

माजी विम्बल्डन विजेत्या राफेल नदालने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक टेनिसमध्ये सर्वाधिक फॅन्स हे राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांचे आहेत. ज्यातील फेडरर उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर गेला असून आता बहुतेकांचे लक्ष राफेलकडे लागून राहिले आहे. राफलने आपल्या सर्व फॅन्सच्या आशावर खरा उतरत उपांत्य फेरीत झेप घेतली आहे.
स्पेनचा राफेल आणि अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो यांच्यात झालेल्या सामन्यात नदालने जुआन मार्टिन डेल पोट्रोचा ५-७, ७-६, ६-४, ४-६, ४-६ अशा फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. याचसोबत त्याने आपले तिसरे विम्बल्डन जिंकण्याचे स्वप्न जिवंत ठेवले आहे.

rafel vs juan
राफेल नदाल आणि जुआन मार्टिन डेल पोट्रो

- Advertisement -

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही खेळाडूंमध्ये उपांत्य फेरीत जाण्याची जिद्द दिसून येत होती. पहिल्या सेटच्या शेवटी डेल पोट्रोची सर्विस मोडत नदालने हा सेट ५-७ असा जिंकला. मात्र, डेल पोट्रोने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले. त्याने हा सेट टायब्रेकरमध्ये ७-६ असा जिंकला. तसेच त्याने तिसराही सेट ६-४ असा जिंकला. त्यामुळे, दिग्गज खेळाडू फेडरर पाठोपाठ नदालही स्पर्धेबाहेर जाणार असे वाटत असताना नदालने योग्य वेळी आपला खेळ उंचावत चौथा सेट ४-६ च्या फरकाने जिंकला. त्यामुळे हा सामना पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला. हा सेटही नदालने ४-६ असा जिंकत स्पर्धेत अप्रतिम विजय मिळवला.

वाचा- विम्बल्डन २०१८ : स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर उपांत्यपूर्वफेरीतून बाहेर

- Advertisement -

या विजयाने नदालने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना नोवाक जोकोविचशी होणार आहे. या सामन्यात दोन्ही दिग्गज आमने-सामने येणार असल्याने हा सामना चुरशीचा होणार हे नक्की.

- Advertisement -