घरक्रीडाRafael Nadal : टेनिस स्टार राफेल नदालला कोरोनाची लागण, ट्विट करत दिली...

Rafael Nadal : टेनिस स्टार राफेल नदालला कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती

Subscribe

टेनिस स्टार राफेल नदालला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राफेल अबुधाबी येथील प्रदर्शनीय स्पर्धेत खेळून तो आपल्या मायदेशी परतला आहे. नदालचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याने स्वत: सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.

अबुधाबी येथील स्पर्धेतून मायदेशात परतल्यानंतर माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्पेनमध्ये आल्यानंतर माझी पीसीआर चाचणी झाली. त्या चाचणीमध्ये त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला सध्या पूर्णपणे बरं वाटत नसून मी हळूहळू बरा होईल, अशी खात्री आहे. तसेच मी घरात उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करू घ्यावी, अशी विनंती करतो, अशा प्रकारचं ट्विट नदालने केलं आहे.

- Advertisement -

राफेल नदालने टेनिस कोर्टवरती वापसी केली आहे. अबुधाबी येथे खेळण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रदर्शनीय सामन्यात त्याला अँडी मरेकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. अँडी मरेने राफेल नदलला ६-३ आणि ७-५ अशी मात केली आहे. दरम्यान, राफेल नदालच्या ऑस्ट्रेलियन ओपन सामन्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. १३ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपनची सुरूवात होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : NZ vs PAK: आगामी २ वर्षांत न्यूझीलंड करणार २ वेळा पाकिस्तान दौरा, पाच महिन्यांमध्ये दोन्ही संघात होणार १५ सामन्यांचा थरार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -