घरक्रीडाराफेल नदालची विम्बल्डन, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार! 'हे' ठरले कारण

राफेल नदालची विम्बल्डन, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार! ‘हे’ ठरले कारण

Subscribe

विम्बल्डनला २८ जूनपासून, तर ऑलिम्पिकला २३ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने आगामी विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. प्रशिक्षक आणि संघाशी चर्चा करून कारकीर्द प्रदीर्घ करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ३५ वर्षीय नदालने सांगितले. नदालने नुकताच फ्रेंच ओपनसह क्ले कोर्टवरील पाच स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर केवळ दोन आठवड्यांतच म्हणजेच २८ जूनपासून विम्बल्डन या ग्रँड स्लॅम स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विश्रांतीसाठी आणि पूर्णपणे फिट होण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने विम्बल्डन व ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतल्याचे नदाल म्हणाला.

शरीराचा विचार करून निर्णय  

मी यावर्षीची विम्बल्डन स्पर्धा आणि टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सोपा नव्हता. परंतु, मी शारीरिकदृष्ट्या पूर्ण फिट असणे गरजेचे आहे. त्यामुळे माझ्या शरीराचा विचार करून आणि संघाशी चर्चा केल्यानंतर या दोन स्पर्धांमधून माघार घेणे हा निर्णय योग्य ठरेल हे मला पटले, असे नदालने ट्विटरमधील पोस्टमध्ये सांगितले.

- Advertisement -

नुकताच खेळला पाच स्पर्धांमध्ये

ऑलिम्पिक स्पर्धेला खूप महत्त्व आहे आणि खेळाडू म्हणून या स्पर्धेत खेळण्याला प्रत्येकच खेळाडू प्राधान्य देतो. मला याआधी तीन ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे भाग्य लाभले आहे आणि एकदा मी ध्वजवाहकही होतो, असेही नदाल त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. २० वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या नदालने नुकताच मोंन्टे कार्लो मास्टर्स, बार्सिलोना, माद्रिद मास्टर्स, रोम मास्टर्स आणि फ्रेंच ओपन या पाच स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. १३ वेळच्या फ्रेंच ओपन विजेत्या नदालला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचने पराभूत केले होते.

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -