घरक्रीडाराफेल नदालचा इटालियन ओपन क्राउन स्पर्धेत विजय

राफेल नदालचा इटालियन ओपन क्राउन स्पर्धेत विजय

Subscribe

तर एलीना स्वेतोलीना शीर्षक राखण्यात यशस्वी

रविवारी झालेल्या इटालियन ओपन क्राउन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नदालने ६-१, १-६, ६-३ अशा फरकाने अलेक्झांडर झवेरेव्हरला मात देत अजिंक्यपद पटकावले. पावसाच्या व्यत्ययानंतर देखील नदालने सामन्यात विजय मिळवला. या सामन्यातील विजयानंतर जागतिक क्रमवारीतील पहिले स्थान राखण्यात नदालला यश मिळाले. रॉजर फेडररला मागे टाकत त्याने या क्रमवारीत पहिले स्थान पटकाविले.
सामन्यानंतरच्या मुलाखतीत नदालने सांगितले की, “२००५ साली या ठिकाणीच मला पहिल्यांदा यश मिळाले होते. तो विजय माझ्या कायम स्मरणात राहिल” ही स्पर्धा जिंकल्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर नदालला फार आनंद झालेला दिसून येत होता. त्याने शँपेन फोडून आपला विजय साजरा केला. सामन्याच्या सुरुवातीला सामना अलेक्झांडरच्या बाजूने झुकताना दिसत होता. मात्र नंतर नदालने आपला खेळ दाखवत विजय मिळवला.
सोबतच युक्रेनच्या एलिना स्वेतोलिना हिने रोमानियाच्या सिमोना हॅलेपला मात देत विजय पटकावला. रविवारी झालेल्या इटालियन ओपन क्राउन स्पर्धेच्या अतिंम सामन्यात एलिनाने ६-०, ६-४ अशा फरकाने सिमोना हॅलेपला मात देत अजिंक्यपद राखले. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावरील हॅलेप ही शनिवारी झालेल्या सामन्यात मारीया शारापोवाला हारवून अंतिम सामन्यात दाखल झाली होती. सामन्यानंतरील मुलाखतीत एलिनाने सांगितले की “मी माझी ट्रॉफी स्वतः जवळ ठेवण्यात यशस्वी झाले, याचा मला फार आनंद होतो आहे” एलिना स्वेतोलिनाने सलग दुसऱ्या वर्षी हा किताब पटकावला आहे. आपल्या शानदार खेळामुळे एलिनाने दोन राऊंडमध्येच सामना जिंकला.
अत्यंत चुरशीच्या या सामन्यानंतर विजय मिळवलेल्या दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले, तसेच त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दोघांनीही आपला विजय फार उत्साहात साजरा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -