घरक्रीडाराहुल चहरला संधी मिळाल्याचा आनंद -निलेश कुलकर्णी

राहुल चहरला संधी मिळाल्याचा आनंद -निलेश कुलकर्णी

Subscribe

राहुल चहरसारख्या युवा फिरकीपटूला संधी देणे आवश्यक असल्याने त्याची भारतीय संघात निवड झाल्याचा आनंद आहे, असे विधान भारताचे आणि मुंबईचे माजी फिरकीपटू निलेश कुलकर्णी यांनी केले. वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारतीय संघाची रविवारी घोषणा झाली. ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी १९ वर्षीय लेगस्पिनर राहुल चहरची निवड झाली आहे. त्याने मागील काही एक-दोन वर्षांत स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

मागील आयपीएलमध्ये विजेत्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने १३ सामन्यांत १३ विकेट्स मिळवल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेच्या ३ सामन्यांत ६ बळी घेतले. या त्याच्या कामगिरीमुळेच त्याची भारतीय संघात निवड झाली.

- Advertisement -

राहुल चहरची भारतीय संघात निवड झाल्याचा मला आनंद आहे. माझ्या मते त्याची संघात निवड होणे ही चांगली गोष्ट आहे, कारण त्याने मागील मोसमात अप्रतिम कामगिरी केली. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना दुखापत झाली किंवा ते फॉर्मात नसतील, तर दुसरा पर्याय तयार करण्याचा निवड समिती प्रयत्न करत आहे. कोणत्याही संघाने एक-दोन खेळाडूंवर अवलंबून राहता कामा नये. त्यामुळे राहुलसारख्या खेळाडूला संघात स्थान देण्याच्या निर्णयाबद्दल निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचे कौतुक केले पाहिजे, असे भारतासाठी ३ कसोटी आणि १० एकदिवसीय सामने खेळणारे कुलकर्णी म्हणाले.

राहुल चहरसोबतच कृणाल पांड्या, रविंद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटूंची भारताच्या टी-२० संघात निवड झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -