घरक्रीडाबॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या विजयानंतर ट्विटरवर राहुल द्रविडची चलती

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या विजयानंतर ट्विटरवर राहुल द्रविडची चलती

Subscribe

अनेक खेळाडूंनी क्रिकेटचे धडे द्र्विड मार्गदर्शनाने गिरवले

भारताने ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीत पराभव करत बॉर्ड-गावस्कर ट्रॉफी जिंकल विजयाला गवसणी घातली. गेल्या ३२ वर्षात ऑस्ट्रेलिया गाबा मैदानावर कोणत्याच संघाकडून पराभूत झाला नाही. त्यामुळे भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसर अनेक बडे राजकीय नेतेमंडळी, सेलिब्रिटी, क्रिकेट विश्वातील दिग्गजांनीही टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या विजयानंतर सोशल मिडियावर सध्या राहुल टीम इंडियाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे. तसेच त्यांच्या नव्या अनेक ट्रेंड सुद्धा सुरु आहेत. अनेकांनी या विजयांचे श्रेय माजी कर्णधार राहुल द्रविड यांना दिले आहे. यामागचे कारण म्हणजे शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या अनेक खेळाडूंनी क्रिकेटचे धडे द्र्विड मार्गदर्शनाने गिरवले आहेत.

- Advertisement -

सोशल मिडियावर भारतीय क्रिकेड खेळाडूंसह राहुल द्रविड यांचे विशेष कौतुक होत आहे. ट्विटरवर राहुल द्रविड यांच्या ट्रेंडची चलती आहे. त्यामुळे राहुल द्रविड यांच्या हातीखाली तयार झालेल्या या खेळाडूंच्या यशाचं श्रेय जातं आहे. राहुल द्रविड भारत अ संघाचा प्रशिक्षक होते त्यावेळी राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, मनीष पांडे, ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी बरेचं क्रिकेट सराव केला आहे. अनेकदा या खेळाडुंच्या तोंडूनही राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाचा क्रिकेटच्या करियरमध्ये कसा फायदा झाला हे ऐकतो.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब्रिस्बेन कसोटी सामन्यात सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर तीन गड्यांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं ८ गड्यानं विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीनं फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखलात मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं. चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघानं विजय मिळवला. सध्या राहुल द्रविड नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीचा चेअरमन आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -