घरक्रीडा...तर रायडूचे वर्ल्डकपमधील स्थान धोक्यात

…तर रायडूचे वर्ल्डकपमधील स्थान धोक्यात

Subscribe

आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजी दिली. बंगळुरूला अवघ्या ७० धावा करता आल्या. याचा पाठलाग करताना चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसन लवकर बाद झाला. मात्र, अंबाती रायडू दुसर्‍या बाजूने संयमाने फलंदाजी करत होता. रायडू नाबाद राहून चेन्नईला हा सामना जिंकवून देणार असे वाटत होते. चेन्नईने हा सामना जिंकला. मात्र, रायडूला नाबाद राहता आले नाही.

विजयासाठी १२ धावांची गरज असताना मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर पुढे येऊन त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला चेंडू समजला नाही आणि तो त्रिफळाचित झाला. या अशा खराब फटाक्यांमुळेच रायडूचे विश्वचषकाच्या संघातील स्थान धोक्यात येऊ शकेल, असे त्यावेळी समालोचन करत असलेले सुनील गावस्कर म्हणाले. रायडूला भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सर्वोत्तम पर्याय मानले जात आहे.

- Advertisement -

रायडू खराब फटका मारून बाद झाला. या अशा फटक्यांमुळेच अचानक त्याच्या विश्वचषकाच्या संघातील समावेशाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चेन्नईला फार धावांची गरज नसतानाही त्याने पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि बाद झाला. त्याने यापुढे सावधगिरी बाळगली पाहिजे. जर तो असे फटके मारून, कमी धावा करून बाद होत राहिला, तर त्याचे विश्वचषकाच्या संघातील स्थान धोक्यात येऊ शकेल, असे गावस्कर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -