घरक्रीडापावसाचीच बॅटिंग : विश्वचषकातील IND vs ENG पहिला सराव सामना रद्द

पावसाचीच बॅटिंग : विश्वचषकातील IND vs ENG पहिला सराव सामना रद्द

Subscribe

IND vs ENG : विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरुवात होणार आहे. त्याआधी सर्व संघ सराव सामन्यात सहभागी होताना दिसत आहेत. भारतीय संघ आज गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळत आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गुवाहाटीत जोरदार पावसाला सुरूवात झाल्यामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. (Rain batting IND vs ENG first warm up match of World Cup cancelled)

हेही वाचा – Asian Games 2023 : वयाच्या 43व्या वर्षी बोपण्णाची सुवर्ण कामगिरी; ऋतुजासोबत मिश्र दुहेरीत बनला चॅम्पियन

- Advertisement -

एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे आणि त्याआधी त्याच फॉरमॅटमध्ये सराव सामने खेळवण्यात येत आहेत. आज गुवाहाटी येथे चौथ्या सराव सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमनेसामने येणार आहेत. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी निर्णय केला आहे. परंतु त्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली.

- Advertisement -

सामना आठ तासाचा होणार असल्यामुळे पावसाने हजेरी लावल्यानंतर हा सामना रद्द होईल की नाही याबाबत पंचांनी निर्णय घेतलेला नव्हता. पण पावसाच्या सरी कोसळत राहिल्यामुळे अखेर 5 वाजून 40 मिनिटांनी सामना रद्द करण्यात आला आहे. याआधी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आशिया चषक स्पर्धेतही अनेक सामने पावसामुळे प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा – Asian Games 2023 : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला एशियन्स गेममध्ये 37 वर्षांनंतर पदक

विश्वचषकात भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. याआधी भारतीय संघाला दोन सराव खेळायचे आहेत. आज भारताचा पहिला सराव इंग्लंडसोबत होत आहे. परंतु पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आला आहे. त्यानंतर भारताला दुसरा सराव सामना 3 ऑक्टोबर रोजी आयर्लंडशी खेळायचा आहे. हे दोन्ही सराव सामने भारतासाठी विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -