अश्विन-प्रितीच्या प्रेमाची गोष्ट : राजस्थान रॉयल्सच्या अष्टपैलू खेळाडू शाळकरी वयातच पडला होता प्रेमात

मुंबई | अष्टपैलू क्रिकेटर आणि राजस्थान रॉयल्सचा मृतभाषिक खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) त्यांच्या संघासाठी उत्तम कामगिरी केली आहे. नेहमी प्रकाश झोतापासून लांब राहणारा अश्विनने त्यांची शाळकरी मैत्री प्रीती नारायणन (Prithi Narayanan) हिशासोबत लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच अश्विन आणि प्रीती हे दोघे जिओ सिनेमावर मॅच सेंटर लाईव्ह या हँग आउट शोमध्ये हजेरील लावली. या शोदरम्यान अश्विनच्या पत्नीने पहिल्यांदा त्यांची लव्हस्टोरी सांगितली.

अश्विनने यंदाच्या आयपीएलच्या (IPL) यदांच्या हंगामात ९ सामन्यांत १३ बळी घेतले आहेत. प्रीती ही पती अश्विनला सपोर्ट करण्यासाठी मैदानात कधीच आली नाही. पण, ती अश्विनचा प्रत्येक सामना टीव्हीवर पाहते. या हँग आउट शो वेदा कृष्णमूर्ती, दानिश सैत आणि सानिया मिर्झा यांनी हा शो होस्ट केला होता.

अश्विन-प्रीतीच्या बालपणीच्या प्रेमाची गोष्टी…

अश्विन आणि त्यांची पत्नी प्रीती हे दोघेही एकाच शाळेत शिकले आहेत.  इयत्ता सातवीपासून हे दोघे एकमेकांना ओळखत होते. अश्विनचे प्रीतीवर पहिल्यापासूनच क्रश होते आणि ही गोष्ट शाळेतील सगळ्यांना देखील माहिती होती. यानंतर अश्विन क्रिकेट करिअरसाठी दुसऱ्या शाळेत गेला. परंतु, अश्विन आणि प्रीती वाढदिवसासह इतर कार्यक्रमात भेट असल्यामुळे दोघेही संपर्कात राहिले. पण, मध्यल्या काळात दोघांचे भेटने देखील कमी झाले होते. यानंतर प्रीती जेव्हा चेन्नई सुपर किंग्जचे खाते सांभाळात होते. तेव्हा अश्विनला ती पुन्हा भेटली. त्यावेळी प्रीतीने अश्विनला क्रिकेटर म्हणूनच पाहिले.

या शोमध्ये अश्विनने कसे प्रपोज केले, असा प्रश्न प्रीतीला विचारल्यावर ती म्हणाली, “अश्विन मला एकदा क्रिकेटच्या मैदानात घेऊन गेला आणि म्हटला की, मी माझ्या आयुष्यात फक्त तुलाच पसंत करतो. गेल्या १० वर्षात तू तीळमात्र बदलेली नाही, असे त्यांनी म्हटले. यानंतर अश्विन आणि प्रीती १३ नोव्हेंबर २०११ रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. या लग्न सोहळ्यासाठी काही मोजकेच लोकच उपस्थित आहेत.