घर क्रीडा पाकिस्तानच्या रमीझ राजा यांनी 'या' भारतीय फलंदाजाचे केले कौतुक; म्हणाले, 'तो मिनी...

पाकिस्तानच्या रमीझ राजा यांनी ‘या’ भारतीय फलंदाजाचे केले कौतुक; म्हणाले, ‘तो मिनी रोहित शर्मा आहे’

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेत युवा सलामीवीर शुभमन गिल याच्या फलंदाजीने रमीझ राजा प्रभावित झाले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी त्याचे कौतुक केले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेत युवा सलामीवीर शुभमन गिल याच्या फलंदाजीने रमीझ राजा प्रभावित झाले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी त्याचे कौतुक केले आहे. रमीझ राजा यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यात साम्य असल्याचे सांगितले. (ramiz raja said india batter shubman gill looks like mini rohit sharma)

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी शुभमन गिल याचे रोहितचे ‘मिनी व्हर्जन’ असे वर्णन केले. तसेच, “शुबमन गिल हा मिनी-रोहित शर्मासारखा दिसतो. त्याच्याकडे वेळ आहे आणि तो एक उत्तम खेळाडू आहे. त्याच्याकडे पुरेशी क्षमता आहे. काळासोबत आक्रमकताही विकसित होईल. त्याला काहीही बदलण्याची गरज नाही”, असे रमीझ राजा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले.

- Advertisement -

“भारतासाठी फलंदाजी करणे सोपे होते कारण त्यांच्याकडे रोहित शर्मासारखा महान फलंदाज आहे. तो खूप चांगला खेळतो. तो हुक-अँड-पुल शॉट्सचा अप्रतिम स्ट्रायकर आहे. त्यामुळे 108 धावांचा पाठलाग करणे सोपे होते. तसेच, भारताच्या फलंदाजांची फ्रंटफूट बॅटिंग कमकुवत दिसत आहे. मागच्या पायाने फटके मारणे सोपे आहे. पण, जेव्हा चेंडू उसळी घेतो तेव्हा तुम्ही बचावात्मक शॉट्स खेळायला जाता, तेव्हा खेळण्याचा धोका असतो” असेही रमीझ राजा म्हणाले.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. रमीझ राजा यांनीही ते कबूल केले. “ही संघाची गोलंदाजी आहे ज्यामुळे त्यांना वनडे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये जिंकण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील भारताची कामगिरी गोलंदाजीवर आधारित आहे कारण त्यांची फलंदाजी ऐतिहासिकदृष्ट्या मजबूत आहे”, असे रमीझ राजा यांनी म्हटले.


- Advertisement -

हेही वाचा – IND VS NZ ODI : भारताचा 8 गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -