घरक्रीडाRanji Trophy 2024: रणजी ट्रॉफी जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला 1 कोटीसह बीएमडब्ल्यू कार;...

Ranji Trophy 2024: रणजी ट्रॉफी जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला 1 कोटीसह बीएमडब्ल्यू कार; कुणाची घोषणा वाचा

Subscribe

पुढील 3 वर्षांत आपल्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपये आणि बीएमडब्ल्यू कार देण्यात येईल, अशी घोषणा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी केली.

हैदराबाद: रणजी ट्रॉफी 2023-24 च्या प्लेट गटाच्या अंतिम सामन्यात हैदराबादने मेघालयचा 5 गडी राखून पराभव केला. तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाकडून के नितेश रेड्डी आणि प्रज्ञा रेड्डी यांनी शतके झळकावली. दरम्यान, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पुढील 3 वर्षांत आपल्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपये आणि बीएमडब्ल्यू कार देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.( Ranji Trophy 2024 so each player will get 1 crore cash and a BMW Who made the announcement)

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे त्यांनी पुढील तीन वर्षांत रणजी ट्रॉफी जिंकल्यावर संघातील प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपये रोख आणि 1 बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून दिली जाईल. त्यांच्या या घोषणेची बातमी सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनाही या पोस्टमध्ये टॅग करण्यात आले आहे.

- Advertisement -

हैदराबादचे कर्णधार टिळक वर्मा करत आहेत हे विशेष. त्यांच्या संघाने अलीकडेच प्लेट गटाच्या अंतिम फेरीत मेघालयचा पराभव केला आहे. मेघालयने पहिल्या डावात 304 धावा केल्या. यादरम्यान, अक्षय चौधरीने अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावात संघाने 243 धावा केल्या. यादरम्यान राज बिस्वाने शतक झळकावले. त्याने 114 चेंडूंचा सामना करत 100 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने पहिल्या डावात 350 धावा केल्या. दुसऱ्या डावात संघाने 203 धावा करत सामना जिंकला. यादरम्यान टिळकने अर्धशतक झळकावले.

इंडियन प्रीमियर लीगची बक्षिसांबाबत बरीच चर्चा झाली आहे. आयपीएलमध्ये संघ खेळाडूंवर करोडो रुपये खर्च करतात. मात्र आता रणजीबाबत केलेली एवढी मोठी घोषणा चर्चेत आली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: IPL 2024: घोट्याच्या शस्त्रक्रियेमुळे मोहम्मद शमी IPL मधून बाहेर; 2024 वर्ल्ड कप खेळणार की नाही?)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -