Homeक्रीडाRanji Trophy : रोहित, पंत आऊट अन् विराट इन; रणजी ट्रॉफीत कोहलीचं...

Ranji Trophy : रोहित, पंत आऊट अन् विराट इन; रणजी ट्रॉफीत कोहलीचं पुनरागमन

Subscribe

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारतीय संघानं केलेल्या खराब कामगिरीमुळे भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयने भारताच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले आहेत. प्रशिक्षक आणि बीसीसीआयच्या आदेशानुसार, सध्या भारतीय संघाचे बरेच खेळाडू रणजी ट्रॉफीचे सामने खेळत आहेत.

Virat Kohli comeback in Ranji Trophy मुंबई : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारतीय संघानं केलेल्या खराब कामगिरीमुळे भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयने भारताच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले आहेत. प्रशिक्षक आणि बीसीसीआयच्या आदेशानुसार, सध्या भारतीय संघाचे बरेच खेळाडू रणजी ट्रॉफीचे सामने खेळत आहेत. अनेक सामन्यांमध्ये रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत आणि शुभमन गिल संघाचे भाग असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता भारताचा अनुभवी खेळाडू आणि रनमशीन विराट कोहली आगामी रणजी ट्रॉफीचा सामना खेळणार आहे. (Ranji Trophy 2025 virat kohli will play after 13 years)

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्याच्या रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामात रेल्वेविरुद्धच्या आगामी सामन्यासाठी सज्ज आहे. विराट कोहली या सामन्यात दाखल होताच त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांची १३ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये गाझियाबादमध्ये दिल्लीचा उत्तर प्रदेशशी सामना झाला तेव्हा रणजी ट्रॉफीमध्ये तो शेवटचा खेळला होता.

दिल्लीचा सामना 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान अरुण जेटली स्टेडियमवर रेल्वेशी होणार आहे. सोमवारी (27 जानेवारी) जाहीर झालेल्या दिल्ली संघात पंतचा समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय, फक्त एक सामना खेळल्यानंतर रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल खेळाडूंनाही रणजी संघातून वगळण्यात आले आहे.

दरम्यान, मागील सामन्यात पंतने दिल्लीच्या रणजी संघाचे नेतृत्व केले होते. सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात फलंदाजीवेळी पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. परिणामी संघाला दोन दिवसांत 10 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. या सामन्याच्या पहिल्या डावात 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना पंतने केवळ 10 चेंडूत फक्त 1 धाव केली तर, दुसऱ्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 26 चेंडूत 17 धावा केल्या.


हेही वाचा – Pak VS WI : लग्न केले अन् रिसेप्शन सोडून जोडपे पोहचले क्रिकेट स्टेडियममध्ये