घरक्रीडाRanji Trophy : मनीष पांडेची दमदार खेळी, ८३ चेंडूत षटकारांच्या जोरावर झळकावले...

Ranji Trophy : मनीष पांडेची दमदार खेळी, ८३ चेंडूत षटकारांच्या जोरावर झळकावले शतक

Subscribe

मनीष पांडेने आपले अर्धशतक केवळ ४६ चेंडूमध्येच केले ज्यामध्ये त्याने ४ चौकार झोडले होते. अर्धशतकीय खेळी केल्यावर पांडेने आक्रमक पवित्रा घेत पुढील ३७ चेंडूतच शतक झळकावले.

रणजी करंडक स्पर्धा 2022 च्या पहिल्याच सामन्यामध्ये खेळाडूंनी आपली दमदार खेळी दाखवली आहे. अंडर-१९ संघाचा कर्णधार यश धूल, गोलंदाज राज बावाने आणि मनीष पांडे पहिल्या सामन्यातील चर्चेतील नावे राहिले आहेत. रेल्वेच्या गोलंदाजांना मनीष पांडेने सळो की पळो करुन सोडलं आहे. कर्नाटकचा कर्णधार मनीष पांडेने चेन्नईच्या आयजी गुरुनानाक कॉलेज ग्राउंडवर शतकीय खेळी केली आहे. पांडेने ८३ चेंडूमध्ये शतकी खेळी केली आहे. तसेच

मनीष पांडेने आक्रमक खेळी करुन रेल्वेच्या गोलंदाजांची चांगलीच खबर घेतली आहे. तसेच त्याने आपल्या अंदाजाला बाजूला ठेवून उत्तम गोलंदाजी केली आहे. मनीष पांडेने ११५ चेंडूमध्ये १५० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १० षटकार आणि ११ चौकार मारले आहेत. कर्नाटकसाठी सुरुवात चांगली राहिली नाही परंतु सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल १६ धावांवर बाद झाला. देवदत्त पडिक्कल २१ धावा करुन बाद झाला. यानंतर समर्थ आणि सिद्धार्थने चांगली भागीदारी करुन संघाला उभारी देण्याचे काम केले मात्र या जोडीला अविनाश यादवने तोडले. यानंतर पांडे मैदानात उतरला आणि चौकार- षटकारांचा पाऊसच पाडला.

- Advertisement -

मनीष पांडेने आपले अर्धशतक केवळ ४६ चेंडूमध्येच केले ज्यामध्ये त्याने ४ चौकार झोडले होते. अर्धशतकीय खेळी केल्यावर पांडेने आक्रमक पवित्रा घेत पुढील ३७ चेंडूतच शतक झळकावले.

मनीष पांडेला नेहमी धीम्या गतीने करत असलेल्या फलंदाजीमुळे ओळखले जायचे आणि टीका केली जायची. आयपीएलमधील स्ट्राइक रेटवरसुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतु आयपीएलपूर्वीच रणजी करंडक स्पर्धेत खेळाताना या फलंदाजाने आपल्या खेळण्याचा अंदाज बदलला आहे. मनीष पांडेला आयपीएल मेगा लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने ४.६० करोड रुपयांना खरेदी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Ranji Trophy 2022: रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी अंडर-१९ खेळाडूंची छाप, यश धूलचे शतक तर बावाची उत्कृष्ट गोलंदाजी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -