Homeक्रीडाRanji Trophy : रणजी ट्रॉफीत मेघालयची दाणादाण, नोंदवला नकोसा विक्रम

Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत मेघालयची दाणादाण, नोंदवला नकोसा विक्रम

Subscribe

मुंबई : सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली आहे. अशामध्ये मुंबई संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संघात रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, अजिंक्य रहाणेसारखे अनेक दिग्गज खेळाडू आहेत. अशामध्ये मुंबई आणि मेघालय यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात एक अनोख्याची विक्रमाची नोंद झाली आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गोलंदाजांनी मेघालयातील फलंदाजांची दैना उडवली. यावेळी अवघ्या 2 धावांवर मेघालय संघाचा अर्धा संघ तंबूत परतला होता. (Ranji Trophy Mumbai vs Meghalay created new record)

हेही वाचा : Virat Kohli : सुरक्षा भेदून विराट कोहलीचा चाहता मैदानात, नेमकं काय घडलं? 

मुंबई संघाचा गोलंदाज शार्दुल ठाकूरसह अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर मेघालयची अवस्था 2 वर 6 विकेट्स बाद अशी झाली होती. तर, संपूर्ण संघ हा अवघ्या 86 धावांवर सर्वबाद झाला. तसेच, तब्बल 91 वर्षात पहिल्यांदाच कमी धावांत अर्धा संघ तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी (30 जानेवारी) मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये रणजी ट्रॉफी 2024-25 सामन्याच्या पहिल्या दिवशी शार्दुल ठाकूरने हॅटट्रिक घेत मेघालय संघाचे कंबरडे मोडले.

मेघालयने नोंदवला नकोसा विक्रम

पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजीसमोर मेघालयच्या फलंदाजांची दैना उडाली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एखाद्या संघाच्या पहिल्या 6 विकेट्स सर्वात कमी धावसंख्येवर पडण्याच्या बाबतीत मेघालय संघ आता या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये पहिल्या स्थानावर एमसीसी संघ असून त्यांनी 1872 मध्ये काउंटी हंगामात शून्य धावांवर आपले पहिले सहा विकेट्स गमावले होते. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर ऑक्सफर्ड विद्यापीठाचा संघ हा 1967 मध्ये तीन धावांवर पहिल्या 6 विकेट्स गमावल्या होत्या.

पहिल्याच दिवशी मुंबई मजबूत स्थितीत

पहिले 6 गाडी तंबूत परतल्यानंतर आलेल्या फलंदाजांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रिंगसांग संगमाने 19 धावा, मेघालयचा कर्णधार आकाश चौधरीने 16 धावा, अनिश चरकने 17 ध्वा तर हिमन फुकानने सर्वाधिक 28 धावा केल्या. यावेळी शार्दुल ठाकूरने 4 विकेट्स, मोहित अवस्थीने 3 विकेट्स, सिल्वेस्टर डिसूझाने 2 विकेट्स आणि शम्स मुलानीने एक विकेट घेतल्या. तर, फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईच्या संघाने सावध सुरुवात केली. 43 धावांवर 2 अशी अवस्था असताना सिद्धेश लाड (नाबाद 89 धावा) तर कर्णधार अजिंक्य रहाणेने (नाबाद 83 धावा) डाव सावरला. दिवसाअखेर मुंबईने 2 विकेट्स गमावत 213 धावा केल्या.