घरक्रीडाRavi Bishnoi : बिश्नोई टी-20 चा नवीन बॉस; ICC रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाचा...

Ravi Bishnoi : बिश्नोई टी-20 चा नवीन बॉस; ICC रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज

Subscribe

नवी दिल्ली : भारताचा लेगस्पिनर रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) बुधवारी (6 डिसेंबर) आयसीसी पुरुषांच्या टी-20 खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. बिश्नोईने फेब्रुवारी 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना फार कमी वेळात जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीचे रवी बिश्नोईला एकप्रकारे बक्षीस मिळाले आहे. पुरुषांच्या टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत 23 वर्षीय रवी बिश्नोईने चार स्थानांनी प्रगती केली आहे. (Ravi Bishnoi is the new T20 boss Number one bowler in ICC rankings)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळली गेलेली टी-20 मालिका भारताने 4-1 ने जिंकली. या मालिकेसाठी रवी बिश्नोईला नुकतेच प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याने 18.22 च्या सरासरीने 9 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय बिश्नोईने आतापर्यंत खेळलेल्या 21 टी-20 सामन्यांमध्ये 17.38 च्या सरासरीने, 14.5 च्या स्ट्राइक रेटने आणि 7.14 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 34 विकेट घेतल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –  Pakistan Cricket Team : भारतीय दाखवणार पाकला विजयाचा मार्ग? प्रशिक्षक म्हणून ‘या’चं नाव चर्चेत

आयसीसीच्या क्रमवारीत रवी बिश्नोई अव्वल स्थानी आहे. त्याच्यानंतर राशिद खान दुसऱ्या स्थानावर, आदिल रशीद तिसऱ्या आणि वानिंदू हसरंगा चौथा आणि महेश थेक्षाना पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे टॉप 10 क्रमवारीत बदल झाले आहेत. भारताचा डावखुरा फिरकी अष्टपैलू अक्षर पटेल याने गोलंदाजांच्या क्रमवारीत 16 स्थानावरून 11 व्या स्थानी झेप घेतली आहे. तर फलंदाजांच्या टी-20 क्रमवारीवर नजर टाकली तर भारताचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जयस्वाल यांने 16 स्थानांनी मोठी झेप 19 व्या विराजमान झाला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेड नुकत्याच भारताविरुद्ध संपलेल्या मालिकेतील चांगल्या प्रदर्शामुळे 16 स्थानांनी झेप घेत 29व्या स्थानावर पोहोचला आहे.

- Advertisement -

एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांची क्रमवारी

एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर शुभमन गिल (फलंदाजी) आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज (गोलंदाजी) अव्वल स्थानी कायम आहेत. मात्र, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील सलामीच्या सामन्यानंतर एकदिवसीय क्रमवारीत काही बदल झाले. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने अँटिग्वा येथे 16 वे एकदिवसीय शतक झळकावल्यानंतर तो आता एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत चार स्थानांनी झेप घेत 11व्या स्थानावर पोहोचला आहे, तर त्याचा सहकारी ब्रँडन किंगने सहा स्थानांनी झेप घेत 78व्या स्थानावर पोहचला आहे.

हेही वाचा – T-20 World Cup 2024 : भारतीय संघात ‘या’ पाच खेळाडूंची नावं निश्चित?

कसोटी गोलंदाजांची क्रमवारी

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनने रेड बॉल क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर तो आता कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा 13व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा फिरकी गोलंदाज तैजुल इस्लामने पहिल्या कसोटीत 10 विकेट्स मदतीने चार स्थानांनी झेप घेताना कारकिर्दीतील सर्वोत्तम 14व्या स्थानावर झेप घेतली आहे.

कसोटी फलंदाजांची क्रमवारी

केन विल्यमसन हा कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तेच न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरिल मिशेल सिलहटमध्ये 41 आणि 58 धावा करत फलंदाजांच्या यादीत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर बांग्लादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावल्यानंतर 13 स्थानांनी झेप घेत 42व्या स्थानावर पोहोचला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -