IPL 2022 : पंतनेही रसेलप्रमाणेच फलंदाजी करावी, रवी शास्त्रींचा सल्ला

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सल्ला दिला आहे. ऋषभ पंतला यंदा आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाहीये. त्यामुळे त्याने केलेल्या खराब कामगिरीमुळे ऋषभ पंत ट्रोल झाला आहे. दरम्यान रवी शास्त्री यांनी पंतला मोलाचा सल्ला दिला आहे. पंतनेही रसेलप्रमाणेच फलंदाजी करावी, असं शास्त्री म्हणाले.

पंतला आतापर्यंत लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाहीये. पंतला कोणताही विचार न करता आंद्रे रसेल मोडमध्ये सल्ला शास्त्रींनी दिलाय. ऋषभ पंत फॉर्ममध्ये परतल्यानंतर त्याला रोखणं कठीण होईल, असे मला वाटतेय. टी-२० मध्ये पंतने आंद्रे रसेल मोडमध्ये फलंदाजी करायला हवी. जर पंतला एखाद्या गोलंदाजाविरोधात फटकेबाजी करायची असल्यास कोणताही विचार न करता फलंदाजी करावी, असं शास्त्री म्हणाले.

ऋषभ पंतने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या तुलनेत यंदा अधिक धावा केल्या आहेत. पंत सेट झाल्यानंतर मोक्याच्या क्षणी विकेट टाकत आहे. दिल्लीच्या संघाला याचा सर्वाधिक फटका बसलाय. पंतला यंदाच्या हंगामात अद्याप एकही मोठी खेळी करता आलेली नाहीये. कारण पंतने आतापर्यंत एकही अर्धशतक ठोकलेलं नाहीये. पंतची सर्वाधिक धावसंख्या ४४ इतकी आहे. आतापर्यंत पंतने ११ सामन्यात ३१.२२ च्या सरासरीने आणि १५२ च्या स्ट्राईक रेटने २८१ धावा केल्या आहेत.


हेही वाचा : आंदोलनाला जाताय मग आत राहायची पण तयारी ठेवा.., अनिल परबांचा राज ठाकरेंना टोला