घरक्रीडाकोहलीचे कर्णधारपद, रवी शास्त्रींचा मोठा खुलासा, व्हाईट - रेड बॉलचे कर्णधारपद...

कोहलीचे कर्णधारपद, रवी शास्त्रींचा मोठा खुलासा, व्हाईट – रेड बॉलचे कर्णधारपद…

Subscribe

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाच्या निमित्ताने एक महत्वाची माहिती दिली आहे. विराट कोहली आपल्या फलंदाजीसाठी एक महत्वाच्या निर्णयाच्या तयारीत आहे. त्यामुळेच रवी शास्त्रींनी विराटच्या एका निर्णयाचे संकेत दिले आहेत. विराटने नुकतीच टी २० कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. वाढत्या वर्कलोड मॅनेजमेंटसाठी विराटने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. कोरोना काळात सततच्या बायोबबलला वैतागल्यानेच कोहलीने न्यूझीलंडविरोधातील टी २० आणि कसोटी सामन्यातून विश्रांतीचा निर्णय घेतला. पण टी २० च्या कर्णधार पदासारखाच निर्णय विराट इतर फॉरमॅटसाठीही घेऊ शकतो, असे रवी शास्त्रींनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विराट कोहली व्हाईट बॉल क्रिकेटचाही राजीनामा देणार असल्याचे संकेतच एकप्रकारे रवी शास्त्रींनी दिले आहेत.

हा निर्णय होणारच

विराट टी २० पाठोपाठ व्हाईट बॉल क्रिकेट म्हणेज एकदिवसीय सामन्यांमध्येही भारतीय संघाचे कर्णधारपद सोडण्याचे संकेत एकप्रकारे रवी शास्त्री यांनी दिले आहेत. यापुढच्या काळात विराट कसोटीतले कर्णधारपदही सोडेल असेही रवी शास्त्रींनी स्पष्ट केले आहे. सध्याचा खेळाचा तणाव कमी करण्यासाठीच विराटकडून हा निर्णय घेतला जाऊ शकतो असेही शास्त्रींनी स्पष्ट केले. विराटच्या नेतृत्वात रेड बॉल क्रिकेट म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. येत्या काळात माझ्या बॅटिंगवर मला लक्ष केंद्रीत करायचे आहे, याचेच एकप्रकारे संकेत विराटने या निर्णयामुळे दिले आहेत. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय हा विराटकडून तत्काळ घेतला जाणार नाही, पण आगामी काळात विराट हा निर्णय नक्कीच घेईल. कसोटी क्रिकेटच्या कर्णधार पदाबाबतही त्याचे मन आणि शरीर किती साथ देणार यावरच कर्णधारपदाचा निर्णय अवलंबून आहे. अनेक यशस्वी खेळाडूंनी त्यांच्याकडे असणारे कर्णधारपद सोडत क्रिकेटवर लक्ष केंद्रित केल्याची याआधीचीही उदाहरणे आहेत. सध्याच्या भारतीय संघात विराट कोहली हा फिटनेसच्या सर्वात फिट खेळाडू आहे.

- Advertisement -

विराट सर्वाधिक फीट

विराट कोहली हा धावांच्या बाबतीत आणखी भुकेला आहे, ही बाब खरी आहे. तसेच संघातील इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा तो फीट आहे. त्यामुळे या गोष्टीबाबत कोणतीही शंका घेता येणार नाही. तुमची फिटनेसच्या बाबतीत फीट असता, तेव्हा इतर गोष्टी दुय्यम असतात. कर्णधारपदाचेही असेच आहे. विराटने एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदाचा निर्णय जरी घेतला, तरीही त्याने कसोटी क्रिकेट मात्र खेळत रहावे, असे मला वाटते. कारण कसोटी क्रिकेटसाठीचा तो सर्वोत्तम एम्बेसेडर आहे. तीच बाब त्याला कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा देत राहिल.

बबल फॅटिग

शास्त्री यांनी संघातील इतर खेळाडूंच्या मोठ्या विश्रांतीवरही टिप्पणी केली आहे. बबल फॅटिगमधून बाहेर पडण्यासाठी अनेक खेळाडूंना हे गरजेचे होते. कोरोना काळात कर्णधारपद वेगळ करण्यावरही शास्त्री बोलले आहेत. कोरोनासारख्या काळात जेव्हा तुम्ही सतत बायोबबलमध्ये असता अशावेळी प्रत्येक वैयक्तिक व्यक्तीवरील तणाव कमी करणे गरजेचे असते. अनेक खेळाडू हे अशावेळी ब्रेक घेत असतात. त्यामुळेच अनेक खेळाडू हे विश्रांती घेताना दिसतात. खेळापासून वेळोवेळी स्विच करण्याची आणि पुन्हा इन होणे तुम्हाला जमायला हवे. आयपीएलसारख्या मोठ्या मालिकेनंतर लगेचच वर्ल्डकपसारखी मालिका खेळणे हा योग्य निर्णय नव्हता. पण भविष्यात असा प्रकार होणार नाही, असा मला विश्वास आहे. कपिल देव हे वेळापत्रकाच्या बाबतीत अतिशय योग्य बोलले आहेत, अशी प्रतिक्रिया रवी शास्त्रींनी दिली.

- Advertisement -

सर्वच बोर्डांनी विचार करावा 

मोठ्या स्पर्धेआधीची विश्रांतीची बाब फक्त बीसीसीआयसाठी मर्यादित नाही, तर प्रत्येक बोर्डाने खेळाडूंच्या या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. आयपीएलच्या समावेशामुळे भारतात सर्वाधिक क्रिकेट खेळले जाते ही बाब विसरून चालणार नाही. यंदाच्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आहेत. या दोन्ही टीमने गेल्या सहा महिन्यात खूपच कमी क्रिकेट खेळले आहे. त्यामुळेच त्यांची कामगिरी अतिशय चांगली झाली. अतिशय दबावाच्या काळातही त्यांनी चांगली कामगिरी केली, कारण त्यांना आपल्या चुका सुधारायची संधी मिळाली, असेही शास्त्री म्हणाले.


हेही वाचा – टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकला मोठा झटका, हसन अलीला गोळी मारा..,पाकिस्तानी संतापले

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -