घरक्रीडाIPL 2023 : माजी प्रशिक्षक रवी शास्त्री पुन्हा चर्चेत; समालोचनावेळी केली 'ही'...

IPL 2023 : माजी प्रशिक्षक रवी शास्त्री पुन्हा चर्चेत; समालोचनावेळी केली ‘ही’ मोठी चूक

Subscribe

क्रिकेटविश्वात आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री पुन्हा चर्चेत आले आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) रणसंग्रामाला शुक्रवारपासून सुरूवात झाली. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला.

क्रिकेटविश्वात आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री पुन्हा चर्चेत आले आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) रणसंग्रामाला शुक्रवारपासून सुरूवात झाली. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्याच्या सुरूवातीला म्हणजेच नाणेफकीच्यावेळी रवी शास्त्री यांनी समालोचन करताना गुजरात टायटन्स या संघाचे चुकीचे नाव घेतले. त्यावेळी गुजरात जायंट्स असे नाव घेतले. त्यामुळे रवी शास्त्री यांनी नेटकरी ट्रोल करत आहेत. (Ravi Shastri Make Blunder During Ipl 2023 1st Match Toss Called Gujarat Titans To Gujarat Giants)

नेमके काय घडलं?

- Advertisement -

आयपीएलच्या 16व्या पर्वाचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्याच्या सुरूवातीला रवी शास्त्रींच्या उपस्थितीत हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक केली. त्यापूर्वी रवी शास्त्री यांनी समालोचन करताना एक चूक केली. रवी शास्त्रींनी समालोचन करताना चुकून गुजरात टायटन्सचे नाव गुजरात जायंट्स असे घेतले.

गुजरात जायंट्स हा संघ नुकताच झालेल्या वुमन प्रीमियर लीगमध्ये (WPL) सहभागी झाला होता. रवी शास्त्रींनी या संघाचे नाव घेतले. गुजरात संघाचे रवी शास्त्री यांनी चुकीचे नाव घेतल्याने सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. दरम्यान, रवी शास्त्रींनी आपल्या समालोचनात चूक केल्यांनतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला आपले हसू आवरता आले नाही.

- Advertisement -

जबरदस्त उद्घाटन सोहळा

आयपीएलच्या 16 व्या हंगामाची अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरूवात झाली. गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यापूर्वी जबरदस्त उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर रवी शास्त्रींच्या उपस्थितीत हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक केली.

नाणेफेक जिंकून गुजरातचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने केलेल्या 92 धावांचा दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 7 बाद 178 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरातला शुभमन गिलने (63 धावा) दमदार सुरूवात करून दिली.

मात्र पदार्पण करणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने गुजरातला एका मागून एक असे तीन धक्के दिले. मात्र मोक्याच्या क्षणी गुजरातने आपला डाव सावरला. राहुल तेवतियाने 15 तर राशिद खानने 3 चेंडूत 10 धावा ठोकत गुजरातला अखेरच्या षटकात विजय मिळवून दिला.


हेही वाचा – IPL 2023 Opening Ceremony: रश्मिका-तमन्नाचा भन्नाट डान्स, अरिजीतच्या गाण्यांवर थिरकले धोनी-हार्दिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -