IPL 2022 : मी त्याची फटकेबाजी पाहून प्रभावित झालो.., रवी शास्त्रींचं तिलक वर्माबाबत मोठं वक्तव्य

मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्माने आपल्या आयपीएलच्या कारकिर्दीला सुरूवात केली आहे. परंतु पहिल्या दोन डावांत त्यांने दिग्गज खेळाडूंना आणि चाहत्यांना आकर्षित केलंय. या दिग्गज खेळाडू आणि चाहत्यांमध्ये भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचही नाव जोडलं गेलं आहे. मी या डावखुऱ्या खेळणाऱ्या युवा फलंदाजाची फटकेबाजी पाहून प्रभावित झालो, अशा प्रकारचं मोठं वक्तव्य रवी शास्त्री यांनी केलं आहे.

यंदाच्या हंगामात तिळक वर्माने आतापर्यंत मुंबईसाठी दोन सामने खेळले असून, त्याने २२ आणि ६१ धावा अशा एकूण ८३ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज तो इशान किशनसोबत क्रिझवर खेळत होता. त्यामुळे मुंबईचा संघ सहज जिंकेल, असे वाटत होते. पण तो आऊट होताच मुंबईने तो सामना गमावला. परंतु या फलंदाजाने आपल्या दोन्ही डावात भरपूर क्षमता दाखवली आहे, असे शास्त्री म्हणाले.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध तिलकने एका डावात ३३ चेंडूत ६१ धावा केल्या आहेत. इशान किशनसोबत ५४ चेंडूत ८१ धावांची भागीदारी केली. याआधी, तिलक वर्मा २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये भारताकडून खेळला आहे. वर्माने मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या दोन्ही डावांमध्ये उत्कृष्ट खेळी केली आहे. त्याच्या फटकेबाजीत फ्रंट फूट, बॅक फूट, स्वीप पाहून मी प्रभावित झालो. त्याच्या शॉट्समध्ये खूप फरक दिसत आहे. युवा खेळाडूची निवड व्हावी, यासाठी त्याची कामगिरी खूपच चांगली आहे, असं रवी शास्त्री म्हणाले.

दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १४ वा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. आजचा सामना कोणता संघ जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा आयपीएलला मोठा फटका