घरक्रीडाहिटमॅन रोहितनंतर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण? भारताच्या माजी प्रशिक्षकांचा मोठा खुलासा

हिटमॅन रोहितनंतर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण? भारताच्या माजी प्रशिक्षकांचा मोठा खुलासा

Subscribe

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताचा सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मानंतर भारतीय संघाचा पुढचा कर्णधार कोण असणार, याबाबत मोठा खुलासा केला आहे. रवी शास्त्रींनी भारताच्या कर्णधाराचे कौतुक केले आहे. तसेच तो खूप चांगलं काम करत असल्याचं देखील शास्त्रींनी म्हटलं आहे. परंतु रोहित शर्माकडे आता कर्णधारपदासाठी २ ते ३ वर्ष आहेत.

भारतीय संघाचा पुढचा कर्णधार कोण?

रवी शास्त्री यांनी आयपीएल ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, रोहित शर्मानंतर कोणता खेळाडू भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो. त्या खेळाडूचं नाव ऐकून सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. रवी शास्त्रींच्या मते ऋषभ पंत, केएल राहुल किंवा श्रेयस अय्यर यापैकी कोणीही भारतीय संघाचा पुढचा कर्णधार होऊ शकतो.

- Advertisement -

ऋषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कसोटी, एकदिवसीय सामना आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्यांनी जागा निश्चित केली आहे. त्यामुळे या तिघांपैकी कोणताही खेळाडू भारतीय संघाच पुढील कर्णधार होऊ शकतो.

रवी शास्त्री म्हणाले की, रनमशीन विराट कोहली आता कर्णधार नाहीये, पण रोहित शर्मा देखील विशेषत: पांढऱ्या चेंडूसाठी चांगला कर्णधार राहिला आहे. भविष्यात संघाचे नेतृत्व कोण करणार हे भारताला दिसणार आहे. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएल राहुल सध्या या शर्यतीत आहेत. भारतीय संघ भविष्यात मजबूत होण्यासाठी चांगल्या कर्णधाराच्या शोधात असणार आहे आणि आयपीएल २०२२ ही सुद्धा उत्कृष्ट संधी आहे.

- Advertisement -

गेल्या आयपीएलमध्ये आम्ही व्यंकटेश अय्यरला पाहिले. त्याच्या बाबतीत कोणीही ऐकले नव्हते आणि परंतु तोपर्यंत त्याचा भारतीय संघात समावेश झाला होता. त्यामुळे तुम्ही अनपेक्षित अपेक्षा करता. हेच आयपीएलचे सौंदर्य आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याने गोलंदाजीकडे पुनरागमन करण्याबाबत मौन बाळगले आहे. परंतु आगामी आयपीएलमध्ये संपूर्ण देश त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल असा विश्वास शास्त्रींनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा : कामावर रुजू का होत नाही? मुंबई हायकोर्टाने एसटी कर्मचार्‍यांना सुनावले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -