Ravi Shastri : विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमावल्याने रवी शास्त्री निराश, म्हणाले आम्ही लेचेपेचे..

आम्ही ५ वर्षांपासून चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळलो आहे आणि एवढ्या कालावधीपर्यंत नंबर वन वर राहणं आव्हानात्मक आहे. यामुळेच आम्हाला सामना जिंकायला हवा होता असे रवी शास्त्री म्हणाले आहेत.

Ravi Shastri statement we wanted to win World Test Championship
Ravi Shastri : विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमावल्याने रवी शास्त्री निराश, म्हणाले आम्ही लेचेपेचे..

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये झालेल्या पराभवाबद्दल वक्तव्य केलं आहे. हा सामना गमावल्यामुळे निराश झाल्याचे रवी शास्त्री म्हणाले. अंतिम सामन्यात पराभव व्हावा एवढे आम्ही लेचेपेचे नव्हतो असेही रवी शास्त्री यांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय संघाला विश्व चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकायला हवा होता असेही ते म्हणाले.

रवि शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर संघाने उत्तम कामगिरी केली आहे. अनेक सामन्यांत संघाला चांगले यश मिळाले आहे. भारतीय संघाने द्विपक्षीय मालिकेत अनेक दिग्गज संघांचा पराभव केला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा दोन वेळा ऑस्ट्रेलियामध्येच पराभव केला आहे. असा पराक्रम करणारा भारतीय संघ पहिलाच आहे. भारतीय संघ २०१९ मध्ये वर्ल्ड कपच्या उपांत्यफेरीत पोहचला आणि २०२१ मध्ये विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. परंतु टीम इंडियाला इग्लंडच्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

विश्व टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळायला हवा होता

रवी शास्त्री यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये कोणत्या सामन्यातील पराभवामुळे निराशा आली याबाबत सांगितले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवामुळे निराशा झालो असल्याचे रवी शास्त्री म्हणाले आहेत. माझ्या कार्यकाळात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना गमावणे माझ्यासाठी सर्वात निराशाजनक आहे. कमीत कमी सामना बरोबरीचा व्हायला हवा होता. आम्ही ५ वर्षांपासून चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळलो आहे आणि एवढ्या कालावधीपर्यंत नंबर वन वर राहणं आव्हानात्मक आहे. यामुळेच आम्हाला सामना जिंकायला हवा होता असे रवी शास्त्री म्हणाले आहेत.


हेही वाचा : IND vs SA 3rd Test : टीम इंडियाचा पहिला डाव २२३ धावांत आटोपला, कोहलीचं अर्धशतक