घरक्रीडाR Ashwin : अश्विनने घरच्या मैदानावर ३०० बळी केले पूर्ण; कुंबळेच्या या...

R Ashwin : अश्विनने घरच्या मैदानावर ३०० बळी केले पूर्ण; कुंबळेच्या या विक्रमाची केली बरोबरी

Subscribe

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने धमाकेदार कामगिरी केली

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने धमाकेदार कामगिरी केली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण १४ बळी घेतले. कानपूर मधील पहिल्या कसोटी सामन्यात ६ बळी पटकावले होते. तर वानखेडे वरील दुसऱ्या सामन्यात १२ बळी पटकवणाऱ्या रवीचंद्रन अश्विनला मालिकावीर म्हणून देखील घोषित करण्यात आले. यासोबतच ३५ वर्षी अनुभवी फिरकीपटू अश्विनने महान रिचर्ड हॅडलीला मागे टाकले आहे. आत्तापर्यंत भारत आणि न्यूझीलंडमधील कसोटी सामन्यांत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत रिचर्ड हॅडली अव्वल स्थानावर होता. त्याने १४ कसोटीमध्ये सर्वाधिक ६५ बळी घेतले होते. दरम्यान अश्विनने आतापर्यंत ९ सामन्यांत ६६ बळी घेतले आहेत. मुंबईतील सामन्यात हॅडलीचा विक्रम मोडण्यासाठी अश्विनला ८ बळींची गरज होती.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू

१. आर. अश्विन (भारत), ८ कसोटी, ६६ बळी
२. रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड), १४ कसोटी, ६५ बळी
३. बिशनसिंग बेदी (भारत), १२ कसोटी, ५७ बळी

- Advertisement -

अश्विनने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. अनिल कुंबळेने वानखेडेवर ३८ बळी घेतले होते. तर अश्विनने देखील ३८ बळी घेऊन या विक्रमाची बरोबरी केली आहे.

वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू

१. आर. अश्विन (भारत), ५ कसोटी, ३८ बळी
२. अनिल कुंबळे (भारत), ७ कसोटी, ३८ बळी
३. कपिल देव (भारत), ११ कसोटी, २८ बळी
४. हरभजन सिंग (भारत), ५ कसोटी, २४ बळी
५. करसन घावरी (भारत), ६ कसोटी, २३ बळी
६. इयान बोथम (इंग्लंड), २ कसोटी, २२ बळी

- Advertisement -

मुंबई कसोटीदरम्यान अश्विनने आणखी एक धमाका केला. आता भारतीय घरच्या मैदानावर ३०० बळी पूर्ण करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळेने हा पराक्रम केला होता. कुंबळेच्या नावावर भारतातर्फे ६३ सामन्यांत ३५० बळी असून तो अव्वल स्थानावर आहे.

भारतीय मैदानावर ३०० बळी घेणारे खेळाडू

१. अनिल कुंबळे, ६३ सामने, ३५० बळी
२. आर. अश्विन, ४९ सामने, ३०० बळी
३. हरभजन सिंग, ५५ सामने, २६५ बळी
४ . कपिल देव, ६५ सामने, २१९ बळी
५.  रवींद्र जडेजा, ३४ सामने, १६२ बळी

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा मुंबईतील कसोटी सामना ३७२ धावांनी जिंकून मालिका १-० अशी खिशात घातली. कसोटी क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत भारतीय संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने हरभजन सिंगला (४१७ बळी) मागे टाकले होते. आता अश्विनच्या खात्यात एकूण ४२७ बळींची नोंद झाली आहे.


हे ही वाचा: http://Ind vs Nz 2nd test : भारताचा वानखेडेवर मोठा विजय, १-० ने मालिका जिंकली


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -