Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा ‘वाईट वाटते’! संजय मांजरेकरांच्या टीकेला अश्विनचे मजेशीर प्रत्युत्तर 

‘वाईट वाटते’! संजय मांजरेकरांच्या टीकेला अश्विनचे मजेशीर प्रत्युत्तर 

क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंबाबत चर्चा करताना अजून अश्विनचे नाव घेणे योग्य ठरणार नाही, असे म्हणाले होते.

Related Story

- Advertisement -

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७८ सामन्यांत ४०९ विकेट घेतल्या आहेत. त्याला तब्बल ३० वेळा एका डावात पाच विकेट घेण्यात यश आले आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. मात्र, अश्विनला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये फारशा विकेट मिळवता आलेल्या नाहीत. त्यामुळे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंबाबत चर्चा करताना अजून अश्विनचे नाव घेणे योग्य ठरणार नाही, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या टीकेला अश्विनने मजेशीर प्रत्युत्तर दिले आहे.

अशा गोष्टी बोलत जाऊ नका  

मांजरेकरांच्या टीकेला उत्तर देताना अश्विनने ‘अपराचित’ या तमिळ चित्रपटातील एक लोकप्रिय डायलॉग असलेली मिम आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली. ज्याचे मराठीत भाषांतर होते, ‘अशा गोष्टी बोलत जाऊ नका, वाईट वाटते’. अश्विनने भारतामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. परंतु, त्याला भारताबाहेर फारसे यश मिळत नसल्याने त्याची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये गणना होऊ शकत नाही, असे मांजरेकर एका क्रिकेट वेबसाईटवरील कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांनी त्यानंतर पुन्हा ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केली.

ट्विटमध्ये काय म्हणाले मांजरेकर?

- Advertisement -

‘ऑल टाइम ग्रेट’ (क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक) ही क्रिकेटपटूला मिळणारी सर्वात मोठी पदवी आहे. डॉन ब्रॅडमन, सोबर्स, गावस्कर, तेंडुलकर, विराट आदींना मी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मानतो. माझा अश्विनचा अपमान करण्याचा अजिबातच हेतू नाही. परंतु, अजून मी त्याची सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये गणना करू शकत नाही, असे मांजरेकर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.

- Advertisement -