घरक्रीडाR Ashwin : २०१८ मध्ये क्रिकेट सोडण्याचा विचार होता; संघ व्यवस्थापनाच्या वृत्तीवर...

R Ashwin : २०१८ मध्ये क्रिकेट सोडण्याचा विचार होता; संघ व्यवस्थापनाच्या वृत्तीवर नाराज अश्विनचा मोठा खुलासा

Subscribe

भारतीय संघातील सध्याच्या गोलंदाजांमधील कसोटी क्रिकेटमध्ये फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन अव्वल स्थानावरील गोलंदाज आहे

भारतीय संघातील सध्याच्या गोलंदाजांमधील कसोटी क्रिकेटमध्ये फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन अव्वल स्थानावरील गोलंदाज आहे. जागतिक पातळीवर अश्विनची सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक फिरकीपटू म्हणून ओळख आहे. दरम्यान आता तर त्याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्येही पुनरागमन केले आहे. मात्र अशातच ३ वर्षांपूर्वी अश्विनला अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार आला होता याबाबत खुद्द अश्विनने एक मोठा खुलासा केला आहे. अश्विनने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो भारतीय संघ व्यवस्थापनाच्या वृत्तीवर नाराज होता त्यामुळे त्याने क्रिकेट सोडण्याचा विचार केला होता.

दरम्यान, अश्विनच्या म्हणण्यानुसार अश्विनच्या क्रिकेटबद्दलच्या निष्ठेवर भारतीय संघातील व्यवस्थापन समिती प्रश्न उपस्थित करत होती. त्याला वारंवार लक्ष्य केले जात होते. त्यामुळे तो दुखावला जात होता. अशातच व्यवस्थापन समितीचा हा भेदभाव २०१८ ते २०२० या दोन वर्षात चालू होता. तर याच दोन वर्षांच्या काळात त्याने अनेक प्रसंगी क्रिकेटला निरोप देण्याचा विचार केला होता.

- Advertisement -

अश्विनने म्हटले की, “२०१८ ते २०२० दरम्यान कित्येकवेळा मी क्रिकेटला निरोप द्यायला हवा असे वाटत होते. मी ज्याप्रकारे मेहनत करत होतो त्यानुसार मला त्याचा लाभ मिळत नव्हता.” दरम्यान, त्या कालावधीत आपल्या गुडघ्याच्या दुखापतीने अश्विन ग्रस्त होता त्यामुळे तो कित्येकवेळा क्रिकेटपासून दूर राहण्याचा विचार करत होता. पहिले त्याला असे वाटले की त्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्या दुखापतीबद्दल गंभीर नाहीत. मी काही कमी केले नाही. संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. तरीही मला तो आधार का नाही. जो इतर सर्वांना मिळत आला आहे. मात्र, लोकांनी येऊन मला मदत करावी, असा विचार करणाऱ्यांपैकी मी नाही. त्या लोकांनी माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नये अशी माझी इच्छा होती.

अर्थात मला संघातून हाकलून द्या असा समज तयार केला जात होता. असे अश्विनने आणखी म्हटले.
भारतीय फिरकीपटू अश्विनच्या म्हणण्यानुसार त्याची तीच योग्य वेळ होती जेव्हा त्याने काहीतरी वेगळं करण्याचा आणि त्यात आणखी चांगलं करण्याचा विचार केला आणि आजच्या घडीला तो त्या बदलानुसार सर्वांसमोर उभा आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: http://IPL 2022 : भारतीय संघातून बाहेर होताच या खेळाडूच्या अडचणीत वाढ; IPL मध्ये मिळत होते ११ कोटी, आता आहे आणखी पैशांच्या शोधात


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -