घरक्रीडाIND vs AUS: सामन्यादरम्यान जडेजा आणि सिराजची नवी खेळी, ऑस्ट्रेलियाचा गंभीर आरोप;...

IND vs AUS: सामन्यादरम्यान जडेजा आणि सिराजची नवी खेळी, ऑस्ट्रेलियाचा गंभीर आरोप; व्हिडीओ व्हायरल…

Subscribe

नागपुरात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीच्या सामन्यात भारतीय संघाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज सिराज हे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. पहिल्याच दिवशी रवींद्र जडेजाने सर्वाधिक पाच गडी बाद केले. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाला पहिल्याच दिवशी १७७ धावांमध्ये ऑलआऊट करता आले. मात्र, गोलंदाजी करतेवेळी जडेजा आणि सिराजने मैदानावर मोठी खेळी केली. या खेळीविरोधात ऑस्ट्रेलियाकडून गंभीर आरोप केले जात आहेत. तसेच या दोघांचाही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रवींद्र जडेजासोबत मोहम्मद सिराज दिसत आहे. जडेजा हा मोहम्मद सिराजच्या हातावून एक गोष्ट घेऊन आपल्या बोटाला लावत आहे. त्यामुळे जडेजाने पहिल्याच दिवशी चिटींग केली, असा आरोप होत आहे. कारण चेंडूवर अशी कोणतीही चकाकणारी गोष्ट लावणे हे नियमांमध्ये बसत नाही. याबाबतचा निर्णय आयसीसी घेऊ शकते. पण त्यासाठी मैदानातील पंचांची भूमिकाही महत्वाची ठरते. दरम्यान, ही गोष्ट नेमकी काय होती. याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. परंतु जडेजाला याचे उत्तर द्यावे लागू शकते.

- Advertisement -

जडेजा आणि अश्विनने झंझावत गोलंदाजी केल्यामुळे संघ अवघ्या १७७ धावांवर आटोपला. याला उत्तर देताना भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ७७ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा (५६) आणि केएल राहुल २० धावा करून बाद झाला.


हेही वाचा : भारताचा कूल कॅप्टन धोनी करतोय ‘हे’ काम; इंस्टाग्रामवरून दिली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -